सातारा : जुना आरटीओ चौकात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरुन जाताना 'स्टोल' चाकात अडकून झालेल्या अपघातात सौ.सारिका अभिजीत देशमुख (मूळ रा.शिवथर ता.सातारा सध्या रा.पुणे) ही महिला ठार झाल्याने सातार्यात खळबळ उडाली आहे. अपघातात सारिका यांची चार वर्षाची मुलगी अन्वी व दुचाकीस्वार चुलतभाउ किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सौ.सारिका या मुलीला घेवून चुलत भावासोबत सातार्यात दवाखान्यात आल्या होत्या. दवाखान्यातील काम झाल्यानंतर हे तिघेही (एम एच 11 झेड 4355) या दुचाकीवरुन निघाले होते. ही दुचाकी दुपारी आरटीओ चौकात आली. त्यावेळी सारिका यांच्या गळ्यातील स्टोल दुचाकीच्या चाकात अडकला होता. त्यांच्या गळ्यातील स्टोल चाकामध्ये गुंडाळला गेल्याने दुचाकीचे चाक जॅम झाले. या घटनेने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व अपघात झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की, सौ.सारिका या जमिनीवर आदळल्या गेल्या व पोटातून थोडी आतडी बाहेर आली होती. दुसरीकडे त्यांची मुलगी व दुचाकीस्वार ही बाजूला फेकले गेले व बचावले. दरम्यान, भरदुपारी अपघाताचा ऐवज ऐकूण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी जखमी महिलेला बाजूला घेतले. तोपर्यंत अपघात पाहून परिसरातील मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली व बघ्यांची गर्दी उसळली. नागरिकांनी तत्काळ जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची पाहणी करुन जखमींची माहिती घेतली. दुचाकीच्या चाकामध्ये स्टोल अडकल्याने हा अपघात झाला असल्याचे समोर आले.
गंभीर जखमी अवस्थेत सौ.सारिका यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. अपघाताची कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |