04:05am | Aug 27, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव विधानसभा निवडणुकीला अद्याप पंधरा महिने बाकी असताना आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी खटावचे भाजपाचे युवानेते महेश शिंदे यांच्या पाठोपाठ, कोरेगाव जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, कोरेगाव पं. स. चे माजी उपसभापती, कोरेगाव राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष किशोर बाचल गेल्या आठवड्यापासून कोरेगाव, खटाव तालुक्यात बैठकांच्या माध्यमातून सक्रिय झाल्याने आ. शशिकांत शिंदे यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढणार असल्याचे चित्र कोरेगाव मतदारसंघात आत्तापासूनच दिसू लागले आहे.
गेल्या अडीच वर्षापासून खटाव तालुक्याचे भाजपाचे युवानेते महेश शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करण्यासाठी कार्यरत आहेत. महेश शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका भाजपच्या झेंड्याखाली आणि पक्षाच्या कमळ चिन्हावर लढवल्या. यापैकी हिवरे, खेडसहीत साधारण मतदार संघातील 225 गावांपैकी 75 गावात ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले. ग्रामपंचायत निवडणुकीसोबत पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाच्या महेश शिंदे यांनी पक्षाच्या झेंड्याखाली लढवल्या. अनेक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या निवडणुकांच्या माध्यमातून सर्वच गावात भारतीय जनता पक्ष पोहचण्यास मदत झाली.
आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपच्या माध्यमातून लढण्यास महेश शिंदे गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असतानाच आता किशोर बाचल यांचे राजकीय आवाहन आ. शिंदे यांच्या समोर आहे. किशोर बाचल हे गेली 30 वर्ष तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर किशोर बाचल दोनवेळा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांनी कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषवले आहे. माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली बाचल हे सलग पंधरा वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून कोरेगाव तालुका काँग्रेस युवक अध्यक्षपदी होते. कोरेगाव जि. प. गटातून कोरेगाव पं. स. चे माजी सभापती शिवाजीराव बर्गे, माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
सन 2003 साली राष्ट्रवादीचे माजी खा. लक्ष्मणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली किशोर बाचल यांनी खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सलग 13 वर्षे राष्ट्रवादीत कार्यरत राहिले. या काळात बाचल यांना आ. शिंदे यांनी कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केले. याच काळात त्यांनी खुल्या कोरेगाव जि. प. गटातून जि. प. ची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या स्व. संभाजीराव बर्गे यांनी पराभव केला होता. त्यानंतर ते आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सलग 13 वर्षे राष्ट्रवादीत कार्यरत राहिले.
आ. शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून दोन वर्षापूर्वी किशोर बाचल पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच काँग्रेस पक्षात दाखल झाले. ना. आनंदराव पाटील यांनी विश्वास दाखवून पक्षातील भीमराव पाटील, किरण बर्गे, मनोहर बर्गे आदी नेत्यांचा विरोध डावलून किशोर बाचल यांना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष केले. राष्ट्रवादी पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करताना शेकडो कार्यकर्ते काँग्रेस पक्षात घेवून येतो, असे आश्वासन बाचल यांनी कोरेगाव बाजार मैदानावरील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ना. पृथ्वीराज चव्हाण, ना. पतंगराव कदम, आ. आनंदराव पाटील यांना त्यावेळी दिले होते. दुर्दैवाने राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले नाहीत. मात्र त्यांच्या काँग्रेस पक्षात परत येण्याने पक्षातंर्गत संघर्ष सुरू होवून त्याची किंमत काँग्रेस पक्षाला पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती, कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोजावी लागली.
आज किशोर बाचल काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी कार्यरत आहेत. राज्य आणि केंद्र पातळीवर राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची आघाडी होणार असल्याचे राजकीय संकेत मिळाले आहेत. त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेला इच्छुक असणार्या सर्व काँग्रेस नेत्यांना नाईलाजाने पुन्हा राष्ट्रवादीचे म्हणजेच पर्यायाने आ. शिंदे यांचेच काम करावे लागणार आहे. त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार किशोर बाचल गेल्या आठवड्यापासून संभाव्य अपक्ष उमेदवार म्हणून कोरेगाव, खटाव तालुक्यातील गावागावात जावून स्थानिक नेत्यांच्या, प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेवू लागले आहेत. आ. शिंदे यांच्याविरोधात कोरेगाव-खटाव तालुक्यात नाराजीचा सूर आहे. याचा राजकीय लाभ मिळण्याचा अंदाज किशोर बाचल यांना आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |