सातारा : महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘नवरत्न दर्पण पुरस्कार - २०२०’ साठी सातारा जिल्ह्यातील प्रथितयश पत्रकार व दै. सामनाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी गजानन चेणगे यांची निवड झाली आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभ्यासू, चिकित्सक तसेच निर्भिड पत्रकार म्हणून ओळख असलेल्या गजानन चेणगे यांनी पुढारी, ऐक्य, सामनामध्ये दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. सातारा आकाशवाणीसाठी असंख्य कार्यक्रमांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच आजवर सामाजिक, राजकीय, कृषी, सहकार क्षेत्रांसह विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली असून अनेक महत्वपूर्ण विषय मार्गी लावण्यात त्यांचे योगदान आहे. वरूणराज भिडे पारितोषिक, स्वामी विवेकानंद युवा साहित्यिक - पत्रकार पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, गौरीशंकर पत्रकारिता पुरस्कार आदी विविध सन्मान त्यांना लाभले आहेत. त्यांच्या ‘प्रभातीचे रंग’ या पुस्तकासही ना. ह. आपटे ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गजानन चेणगे यांच्या चौफेर कार्याची दखल घेऊन फौंडेशनने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. पत्रकार दिनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे ५ जानेवारी रोजी सातारा येथील शाहू कलामंदिरात आयोजित समारंभात हा पुरस्कार चेणगे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव लोहार यांनी दिली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |