09:08pm | Jul 25, 2019 |
सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातार्यातील राष्ट्रवादी भवनात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींना दांडी मारुन भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळकटी दिली आहे. दरम्यान, जावली तालुक्यातील भाजप नेते दीपक पवार यांना महामंडळ (राज्यमंत्री दर्जा) देऊन शिवेंद्रराजे व दीपक पवारांमध्ये पॅचअप करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. 1999 पासून सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेतही राष्ट्रवादीने हा आपला बालेकिल्ला शाबूत राखण्यात यश मिळवले. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजप सरकार संपूर्ण बहुमताने आल्याने विधानसभा निवडणुकीअगोदरच राष्ट्रवादीच्या तंबूत खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीतील राज्यातील कद्दावर नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने सातार्यातील राष्ट्रवादीमधील शिलेदारांची अस्वस्थता वाढली आहे. गेल्या पाच वर्षात सत्तेत नसल्याने मतदारसंघातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. भाजप-शिवसेना सरकारही विरोधी पक्षातील आमदारांना विकासनिधी वाटपात सापत्नभावाची वागणूक देत असल्याने सर सलामत तो पगडी पचास या नीतीनुसार राष्ट्रवादीत राहिलो तर आगामी निवडणुकीत जिंकण्याची शक्यता कमी असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारही भाजप-शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली होती. आता राष्ट्रवादीचे विद्यमान आ. शिवेंद्रराजे भोसले भाजपात जाणार, अशा चर्चा जिल्ह्यात झडत होत्या. मात्र आ. शिवेंद्रराजे यांनी याबाबत सावध पवित्रा घेत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज दि. 25 रोजी सातार्यातील राष्ट्रवादी भवनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीला दांडी मारुन या चर्चांना बळकटी दिली आहे.
दरम्यान, आ. शिवेंद्रराजे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणार्या दीपक पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावून दीपक पवारांचे पुनर्वसन केले. त्यामुळे आ. शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग अगदी वन वे झाला आहे. सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने रेड कार्पेट टाकूनही त्यांनी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेवून राष्ट्रवादीतून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही. परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. शिवेंद्रराजेंना गळाला लावून व शिवेंद्रराजेंचे प्रतिस्पर्धी असलेल्या दीपक पवारांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देवून राष्ट्रवादीसह उदयनराजेंनाही चेकमेट दिला आहे. भाजपच्या या खेळीमुळे मात्र राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीमधील इतर नेत्यांनाही शिवसेना भाजपकडून गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणार्या काही दिवसांमध्ये वेगवान घडामोडी घडणार आहेत. कोण जाणार आणि कोण येणार या एकच चर्चेमुळे सातार्यातील जनतेची उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र, आमचं ठरलंय, हा कोल्हापूर पॅटर्न सातार्यातही चालणार, अशी चर्चा आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे सातारा, जावली, कोरेगाव, वाई या मतदारसंघाची समीकरणे बिघडणार आहेत. गेली वीस वर्षे राष्ट्रवादीचा अभेद्य असा बालेकिल्ला उडविण्यात भाजप-शिवसेनेला काहीअंशी यश आले आहे. मात्र खरी परिक्षा आ. शिवेंद्रराजेंच्या अधिकृत भाजप प्रवेशानंतरच होणार आहे. मात्र, जे काही घडत आहे, ते सर्वकाही राष्ट्रवादीला गोत्यात आणणारे ठरत आहे. दीपक पवारांची महामंडळपदी वर्णी लागणे, आ. शिवेंद्रराजेंचे मुलाखतीला न फिरकणे या सर्व गोष्टी भाजपपूरक असल्याचे जाणवत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |