01:04am | Aug 03, 2018 |
सातारा : अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी गटाने बुधवारी (दि. १ ऑगस्ट) देगाव (ता. जि. सातारा) येथील बीव्हीजी ग्रुपच्या मेगा फूड पार्कमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. येथे सुरू असलेल्या कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी (ओएसडी) श्रीमती. पुष्पा सुब्रमण्यम, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे (एमएसीपी) जिल्हा उपसंचालक श्री. विजयकुमार राऊत, 'आयएलएफएस'चे अधिकारी श्री. विजय भास्कर रेड्डी यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत फूड पार्कचे उपाध्यक्ष श्री. विजयकुमार छोले यांनी केले. अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी गटाने फूड पार्कमध्ये सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठीच्या सूचनाही दिल्या. दळणवळणाची साधने, वीज, पाणी आणि इतर सर्व सुविधांनी सुसज्ज असा फूड पार्क उभारणीत बीव्हीजी ग्रुपने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
फूड पार्कची पाहणी केल्यानंतर श्रीमती. पुष्पा सुब्रमण्यम म्हणाल्या की, केंद्र सरकारने ११ व्या पंचवार्षिक योजनेतून देशभरात एकूण १५ मेगा फूड पार्कला मान्यता दिली आहे. त्यापैकीच एक असलेल्या सातारा मेगा फूड पार्कचे कामही वेगात सुरू आहे. या प्रकल्पात साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार शेतमालावर प्रक्रिया केली जाणार आहे. भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) उभारलेला हा प्रकल्प शेतकरी आणि प्रक्रिया उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या फूड पार्कमधील सर्व ३२ कंपन्या सुरू झाल्यानंतर येथे ६ हजारांपेक्षा जास्त जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे उत्पादकांनाही चांगला भाव मिळण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने असे मेगा फूड पार्क सुरू केल्याची माहिती श्रीमती. पुष्पा सुब्रमण्यम यांनी दिली. त्यांनी सांगितले की, स्थानिक गरज आणि उत्पादित भाजीपाला व फळांवर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने सातारा मेगा फूड पार्कला सरकारने मान्यता दिली आहे. त्याचे काम वेगाने सुरू असून शेतकरी, शेतकरी कंपनी आणि प्रक्रिया उद्योजकांनी येथे येऊन गुंतवणूक करायला हवी. आतापर्यंत या फूड पार्कमध्ये गुंतवणूक करून उत्पादन सुरू केलेले उद्योजक कौतुकास पात्र आहेत. कारण त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळण्यासाठी मोठी मदत होत आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |