खंडाळा : खंडाळा तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील शेतकरी, महिला तसेच सराफ व्यवसायिक यांना कोटयावधी रुपयांना गंडा घालुन फरार झालेल्या वैभव भास्कर धामणकर हा जुन्या गुन्हयातील सोने हस्तगत करण्यासाठी आला असताना पोलीसांनी त्यास अटक केली होती. दरम्यान यावेळी खंडाळा न्यायालयाने दिलेली सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्या नंतर पुन्हा एकदा दोन्ही बाजुच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने नव्याने सहा दिवसाने पोलीस कोठडित वाढ केली आहे. वैभव धामणकर याने खंडाळा न्यायालयाने दिलेल्या सहा दिवसाच्या पोलीस कोठडि विरोधात सातारा येथील न्यायालयात तक्रार दाखल केली होती. परंतु न्यायालयाने पोलीसांची बाजु समजुन घेत हि पोलीस कोठडि कायम ठेवली.
याबाबत खंडाळा पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खंडाळा येथील वैभव ज्वेलर्सचे मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी निलम धामणकर या दाम्पत्याने केसुर्डी ता. खंडाळा येथील दोन व परिंचे (ता.पुरंदर ) येथील तीन शेतकऱ्यांसह महिलांना आपला सोन्याची बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय असून ती बनवेलली बिस्किटे आम्ही परदेशात पाठवित असून त्या पासून आम्हाला भरपूर फायदा होतो. अशी भूरळ घालत शेतकरी व महिलांशी जवळीक करून त्यांच्याकडून एमआयडीसी प्रकल्पासाठी गेलेल्या जमिनीचे मिळालेले पैसे दीड वर्षात दुप्पट करून देतो तसेच ते पैसे तुमच्या बॅंक खात्यावर ट्रान्सफर करू. असे सांगून विश्सास संपादन करून सुमारे एक कोटी 29 लक्ष 50 हजार रूपये धनादेशाद्वारे स्विकारले. दीड वर्ष झाल्यानंतर त्याची मुदत संपल्याने शेतकऱ्यांनी पैशाची मागणी सुरू केली त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली तर काहींना खात्यावर पैसे नसतानाही चेक दिले. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. आणि त्यांनी खंडाळा पोलीसीात धाव घेतली. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली हे कळताच संशयित आरोपी फरारी झाले होते. त्यांना शाधण्यासाठी पोलीसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती . यानंतर पोलिसांना तपासादरम्यान पुणे येथे सराफ व्यवसाय करणाऱ्या महेंद्रकुमार कावेडिया व्यापाऱ्यांची दोन कोटि पंच्याहत्तर लाख चोवीस हजार पाचशे रुपये रतननचंद दालिचंद यांना एक लाख चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे उघड झाले होते. याबाबत संबधितानी पुणे येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. तर सोन्याचे दागिने घडवुन देतो असे सांगत लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात नव्याने तक्रारी अर्ज दाखल झाले होते .तसेच सर्वसामान्य जनतेने सोन्याचे दागिने करिता लावलेल्या भिशीतुन हजारो रूपयांची फसवणुक झाली असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यानंतर संशयित आरोपींनी २८ जानेवारी रोजी फसवणुकीच्या गुन्हयातुन जामिन मिळवण्यासाठी सातारा येथील सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने नाकारला होता तसेच मुंबई हायकोर्टने हि त्यांचा अटकपुर्व जामिनअर्ज नाकारला होता असे पोलीसांनी सांगितले. यामधील संशयित निलम वैभव धामणकर अद्यापही फरार असुन शोधार्थ दोन महिला पथके रवाना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पो. अधिकारी सुहास गरूड व स. पो.नि हनुमंत गायकवाड करित आहेत.
युक्तीवाद ऐकण्यासाठी लोकांची न्यायालयात गर्दी
फसवणुकीच्या गुन्ह्यातील वैभव धामणकर यास खंडाळा न्यायालय न्यायालयीन कोठडि देणार कि पोलीस कोठडि कायम राहणार हे पाहण्यासाठी अनेक जणांनी न्यायालयात एकच गर्दी केली होती. परंतु न्यायालयासमोर पो. अधिकारी सुहास गरूड व हनुमंत गायकवाड यांनी आपली बाजु भक्कमपणे ठेवल्याने आरोपीस एकुण १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
या गुन्हयाची व्याप्ती मोठया प्रमाणात वाढल्याने यामध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९व ४५ लावण्यात आले असुन वैभव धामणकर व निलम धामणकर यांनी बेकायदेशीरपणे व्याजापोटि २क्कम देउन वसुली करण्यास तगादा लावला असेल तर लोकांनी खंडाळा पो. स्टेशन येथे संपर्क साध०याचे आवाहन उपविभागीय पो. अधिकारी सुहास गरूड व स. पो.नि हनुमंत गायकवाड यांनी केले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |