02:41am | Apr 11, 2019 |
सातारा : मटका धंदा सुरु ठेवण्यासाठी मटका व्यवसायिकाला दर महिन्याला 30 हजार रुपयांची खंडणी मागून इनोव्हा कारमधून अपहरण करत जबरी चोरी केल्याप्रकरणी सुनील काळेकर (रा.रविवार पेठ) व त्याच्या एका साथीदाराविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सुनील काळेकार हा भाजपचा पदाधिकारी असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
जैनुद्दिन जमाल पठाण (वय 50, रा.मेढा ता.जावली) यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार जैनुद्दिन पठाण हे दि. 8 रोजी सकाळी साडेअकरा वाजता मेढ्यातून सातार्यात आले होेते. सातारा शहरात मटका घेणे हा त्यांचा व्यवसाय आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शाहू स्टेडियम, भूविकास चौकात मटका, जुगाराचे पैसे ते गोळा करत होते. यावेळी एम एच 04 - 2322 ही राकाड्या रंगाची इनोव्हा कार तक्रारदार पठाण यांच्याजवळ येवून थांबली व त्यातून एक अनोळखी व्यक्ती खाली उतरली.
इनोव्हा कारमधून खाली उतरुन आलेली व्यक्ती ‘तुला सुनील काळेकर यांनी बोलावले आहे,’ असे म्हणत तक्रारदार जैनुद्दिन पठाण यांना जबरदस्तीने कारपर्यंत ओढत नेले. कारमध्ये सुनील काळेकर हा होता, तो म्हणाला, ‘मला ओळखले का? मी भाजपचा शहराध्यक्ष आहे.’ यावेळी तक्रारदार पठाण यांनी सुनील काळेकर याला ओळखत असल्याचे सांगितले. यावेळी सुनील काळेकर याने जैनुद्दिन पठाण यांना जब्बार पठाणला फोन लावण्यास सांगून त्याला 30 हजार रुपये द्यायला सांग, तो माझे फोन उचलत नाही, असे काळेकर म्हणाला. पठाण यांनी फोन लावायचा प्रयत्न केला मात्र जब्बार याला फोन लागला नाही.
या कालावधीत सुनील काळेकर व अनोळखी व्यक्तीने तक्रारदार जैनुद्दिन पठाण यांना इनोव्हा कारमध्ये कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. कार राधिका रोडच्या दिशेने निघाली. यावेळी काळेकर याने तक्रारदाराच्या खिशातील एकूण 4500 रुपये जबरदस्तीने काढले. अनोळखी संशयिताने गम्मत जम्मत दुकानासमोर कार थांबवून त्याच पैशांच्या दारुच्या बाटल्या घेतल्या. काळेकर व अनोळखीने पुन्हा कार शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरात आणली. याठिकाणीही पुन्हा पैशांची मागणी करत फोन लावण्यास सांगितले. पैसे मिळत नसल्याने अखेर संशयित दोघांनी तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात नेवून ‘हा जब्बारचा माणूस असून तो मटका घेताना सापडला असल्याचे सांगितले.’ अशाप्रकारे तक्रारदार जैनुद्दिन पठाण यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुनील काळेकर व अनोळखी एकाविरुध्द तक्रार दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |