मेढा : पवारवाडी ता. जावली येथील किनारी देवीच्या मंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम चोरणाऱ्या संशयितास मेढा पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि. 13 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने पवारवाडी येथील किनाळीदेवीच्या मंदिरात चोरी केली होती. या मंदिरातील दानपेटीतून रोख 2 हजार 500 रूपये व देवीच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली माळ असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी शंकर बाबुराव यांनी ढवळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मंदिरात पैसे व दागिने चोरी झाल्याने या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान बनले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी श्वानपथक, ठसे तज्ञ तसेच एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली होती. पोलिस तपास करत असतानाच संशयित दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता, दोघांनी चोरीची कबुली दिली.तसेच त्यांच्याकडून रोख रकमेपैकी 970 रूपये व सोन्याच्या मण्याची माळ पोलिसांनी जप्त केली.
मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने, फौजदार सागर गवसणे, हवालदार नितीन पवार, अभिजीत सुतार, संजय शिर्के, नितेश कणाके, अमर जाधव, संजू काळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला अवघ्या 4 तासामध्ये या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याने भक्तवर्गातुन पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |