सातारा : महाराष्ट्र शासनाच्या " मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने " अंतर्गत राज्यातील कृषीपंपाना सौर ऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत महावितरण कंपनीने कृषी प्राबल्य असलेल्या 20 जिल्हयातील सुमारे 218 तालुक्यात 2मेगावॅट ते 10 मेगावॅट इतक्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्पर्धात्मक निविदा काढली आहे.या प्रकल्पाची एकूण क्षमता अंदाजे 1000 मेगावॅट असून तालुकानिहाय 10 मेगावॅट व जिल्हानिहाय 50 मेगावॅट अशी मर्यादा विहित केलेली आहे. ही निविदा महावितरणचे संकेतस्थळ "www.mahadiscom.in" तसेच केंद्रशासन उपक्रम असलेल्या TCIL च्या "www.tcil-india-electronictender.com" या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर ई-निविदा ही "www.tcil-india-electronictender.com" या संकेत स्थळावर नोंदणी करुन भरता येईल.
या योजनेंतर्गत सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरणच्या उपकेंद्राशी 22 किव्हो किंवा 11 किव्होवर जोडण्यात येणार असून त्यामुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवरील भार कमी होऊन विजहानी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नविन पायाभूत सुविधांची आवश्यकता कमी होण्यासही मदत होईल. या योजनेत ग्रामीण भागातील सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेमुळे कृषी वाहिनीद्वारे शेतीपंपांना दिवसाच्या वेळेस वीजउपलब्ध करुन देण्यास उपयोगी ठरेल. तसेच महावितरण कंपनीस नुतनशील वीजखरेदी बंधनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.
या निविदा प्रक्रियेत सर्व सौर ऊर्जा प्रकल्प विकासकांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात येत आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |