सातारा : माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना भाजपकडून गोव्याच्या राज्यपालपदाची ऑफर भाजपकडून दिली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून, राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटीलांना माढ्याच्या बदल्यात हे पद ऑफर केल्याची चर्चा आहे.
कालच माढ्याचा तिढा सुटला आहे. महायुतीनं भाजप मधून फलटण येथील युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील की रणजितसिंह नाईक-निंबाळकर याविषयी घोडे अडले होते. काल भाजपचे केंद्रीय निवडणूक सचिव जे.पी. नड्डा यांनी भाजपची लोकसभेच्या उमेदवारांची बारावी यादी जाहीर करीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटलांच्या घरातील यंदा उमेदवार नसल्याने माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात नाराजी पसरली होती. त्यामुळे भाजपा हायकमांडने विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुर्नवसन करण्याचे ठरविले असून या निवडणूकीच्या निकालानंतर व आचारसंहिता संपताच, खा.विजयसिंह मोहिते-पाटलांची गोव्याच्या राज्यपालपदाच्या निवडीची घोषणा केली जाणार आहे. मात्र माढा लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी मोहिते-पाटलांना जिवाचे रान करावे लागणार आहे. सध्या खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी, विजयसिंह मोहिते-पाटील तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीतच आहेत. लवकरच ते आपल्या राष्ट्रवादी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा ही देणार असल्याची चर्चा आहे. यानंतरच त्यांच्या राज्यपाल पदाची घोषणा होणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |