11:18pm | Oct 27, 2018 |
सातारा : ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणार्या दिवंगत खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी आहे. याच ऑलिम्पिकविराला अभिवादन करण्यासाठी झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सहभागी होणारा ‘यशवंत सातारा कुस्ती संघ’ सोमवारी (दि. 29) कराड तालुक्यातील गोळेश्वरला येणार आहे. झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सहभागी होणारा हा संघ कुस्तीपट्टू खाशाबा जाधवांची प्रेरणा घेऊनच राज्यात जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. यशवंत सातारा संघाचे मनोबल वाढविण्यासाठी जास्तीत जास्त कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे आयोजक पुरूषोत्तम जाधव यांनी केले आहे.
’झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ दि. 2 ते 18 नोव्हेंबर कालावधीत दररोज सायं.6 ते 9:30 वा. झी टॉकीज वर होत आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या जिह्याची ’यशवंत सातारा’ संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेचे अभियान सोमवारी (दि. 29) सकाळी 10 वा. स्वराज्याची राजधानी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करत आहोत. यानंतर सकाळी 11 वाजता स्वतंत्र भारत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कुस्तीपट्टू स्व.पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या गावी गोळेश्वर (ता. कराड) येथे जाणार आहोत. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी प्रीतिसंगमावर अभिवादन व दु. 1 वाजता आटके (ता. कराड) येथे महाराष्ट्र केसरी स्व. पै. संजय पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहोत. यशवंत सातारा संघाचे सर्व सहभागी खेळाडू तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडाक्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समस्त सातरकरांनी आपल्या सातारा जिल्ह्याच्या ’ यशवंत सातारा ’ संघाचे मनोबल उंचावण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे आयोजक पुरुषोत्तम जाधव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |