मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे समोर आली असून ८ कॅबिनेट व दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसने खाती देताना प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी पश्चिम महाराष्ट्राला काँग्रेसने कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं नाही.
काँग्रेसच्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश आहे. त्याशिवाय ज्येष्ठ आमदार के.सी. पाडवी, माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, अमित देशमुख आदींचा समावेश आहे. काँग्रेसने दोन महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले असून यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून भाजपला हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सतेज उर्फ बंटी पाटील हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ल (ता. ३०) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर थोरात यांनी पुन्हा मल्लिकार्जुन खडगे यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदीर्घ चर्चा केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. अनपेक्षितपणे सुनील केदार यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
काँग्रेसकडून अशोक चव्हाण (कॅबिनेट), के.सी.पडवी (कॅबिनेट), विजय वडेट्टीवार (कॅबिनेट), अमित देशमुख (कॅबिनेट), सुनिल केदार (कॅबिनेट), यशोमती ठाकूर (कॅबिनेट), वर्षा गायकवाड (कॅबिनेट), अस्लम शेख (कॅबिनेट), सतेज पाटील (राज्यमंत्री), विश्वजित कदम (राज्यमंत्री) यांना संधी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हात देणाऱ्या विदर्भातून सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वड्डेवटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. नितीन राऊत यांनी सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे विदर्भातून चार कॅबिनेट मंत्री असणार आहेत. तर, मुंबईतून काँग्रेसच्या तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या वर्षा गायकवाड व अस्लम शेख यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. हे दोघेही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. नंदुरबार अक्कलकुवाचे आमदार के. सी. पाडावी यांनादेखील कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे.
राष्ट्रवादीकडून वाईचे आमदार मकरंद पाटलांना डावलल्याने समर्थकांचे राजीनामे
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदातून डावलल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह तब्बल आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. सुरुर येथील किसनवीरांच्या पुतळ्यासमोर सर्व जण आत्मक्लेश आंदोलनही करणार आहेत. खासदारकी कराडला, मंत्रिपदही कराडला, आता सातारा जिल्ह्याचे नाव ही बदलून टाका, अशा शब्दात कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |