सातारा : आपआपसात संगनमत करुन साताऱ्यातील शिव सह्याद्री सहकारी पतपेढीची तब्बल 75 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. संशयित कराड व साताऱ्यातील आहेत. दरम्यान, ज्या जमिनीवर कर्ज घेतले त्याच जमिनीवर यापूर्वीही 90 लाखाचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.
अशोक जगन्नाथ भावके (रा. मलकापूर), शांताराम एकनाथ भावके (रा.घोगाव), संजय वसंत जानगुडे (रा.वाठार सर्व ता.कराड) व अमोल काशीनाथ चव्हाण (रा.गोडोली, सातारा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवसह्याद्री पतपेढी तर्फे प्रवीण जगन्नाथ लोटेकर (रा.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित चौघांनी शिवसह्याद्री पतसंस्थेकडे अर्ज करुन 75 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली. त्यासाठी संशयितांनी कर्ज तारण म्हणून घोगाव ता. कराड येथील शेतजमीन ठेवली. ऑगस्ट 2013 मध्ये कर्ज मंजूर झाल्यानंतर मासिक 84 हप्त्यामध्ये ते कर्ज फेडायचे होते. मात्र संशयितांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. यामुळे पतसंस्थेने सहाय्यक निबंधक सातारा यांनी महाराष्ट्र सहकारी कायद्याप्रमाणे वसुली दावा दाखल केला.
दिलेल्या कर्जाची रक्कम वसुल करण्यासाठी प्रक्रिया पतसंस्थेकडून सुरू करण्यात आली. यासाठी संशयितांनी ज्या जमिनीवर कर्ज घेतले त्या जमिनीचा सातबारा व उतारा घोगाव येथील तलाठी यांच्याकडून काढून घेतला. यावेळी यापूर्वीच शिवसह्याद्री पतसंस्थेच्या मुंबई शाखेचा बोजा असल्याचे आढळून आले. यापूर्वीच संशयितांनी मुंबई शाखेकडून या जमिनीवर 90 लाखांचे कर्ज घेतल्याचेही आढळून आले. तर सातारा शाखेच्या पतसंस्थेचे बोजा म्हणून नाव नसल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |