सातारा : पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या (१०) सप्टेंबर रोजी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या बंदमध्ये सामील होवून सरकाचा निषेध करावा, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व जिल्हा प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
केंद्रात व राज्यात सरकार येवून ४ वर्षाचा कालावधी झाला आहे. हे सरकार कुठल्याच बाबतीत सर्वसामान्य जनतेला न्याय देत नसल्याबाबत व विकासाच्या बाबतीत होणाऱ्या जाहिरातीमधील सतत दाखवणाऱ्या खोट्या आकडेवारीमुळे जनता सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढीसंदर्भात आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत कमी दर असताना देशात कमी दर आकारणे आवश्यक होते. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर उतरल्यावरही या सरकारने देशात दर कमी केले नाही. उलट बाहेर भाववाढ झाल्यानंतर रितसर भाववाढ सुरुच ठेवली आंतरराष्ट्रीय बाजारात वारंवार रुपयाची घसरण होत आहे. तसेच शेतकरी विरोधी धोरणामुळे गेल्या ४ वर्षात एकाही पिकाला हमीभाव एवढा बाजारभाव मिळू शकला नाही. या सर्व गोष्टी सर्वसामान्यांच्या लक्षात आल्या आहेत. म्हणून सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या वारंवार होणाऱ्या पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी आवश्यक सेवा वगळून सातारा जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी या बंदमध्ये सामील होवून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |