02:32am | Feb 21, 2020 |
सातारा : सातारा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करत हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित इतर हॉकर्सचे पदाधिकारी व पोलिसांनी त्यांना रोखले व अनर्थ टळला. पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेऊन त्यांना शहर पोलीस ठाण्याकडे रवाना केले.
सातार्यात नगरपालिकेने गत सोमवारपासून अतिक्रमण तीव्र केली आहे. त्याच दिवसापासून वाहतूक शाखेनेही बसस्थानकासमोरील अतिक्रमणे काढण्यास फेरीवाल्यांना बजावले होते. मात्र, हॉकर्स संघटनेने त्याला विरोध करत मंगळवारी रास्ता रोको केला. मात्र पोलिसांनी धरपकड केली. गुरुवारी पुन्हा वाहतूक पोलिस आणि हॉकर्स संघटनेचे सदस्य आमनेसामने आले. पोलिस फेरीवाल्यांना हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याचे सांगून अतिक्रमण काढण्यास बजावत होते तर फेरीवाले हातगाडे हटवू नका अशी विनंती करत होते. मात्र, पोलिस भुमिकेवर ठाम राहिले. दरम्यान बसस्थानकावर जमाव वाढू लागला. हॉकर्स संघटनेचे जवळपास तीनशे सदस्य त्याठिकाणी आले होते. याचवेळी संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी अंगावर रॉकेलने भरलेली बाटली अंगावर ओतून रिकामी केली. त्याचवेळी त्यांचे सहकारी व पोलिसांनी त्यांना तेथेच रोखले. रॉकेलने भिजून गेलेल्या पवार यांना बाजूला नेवून बसवले. या घटनेने सर्व आंदोलक संतापले. यानंतर सर्व जमाव शहर पोलिस ठाण्यात आला. पोलिसांनी जमावास शांततेचे आवाहन केले. त्यावेळी हॉकर्स संघटनेच्या सदस्यांनी तक्रार नाही पण पोलिसांची वाहतूक शाखेविरोधात तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.
फेरीवाला समितीची रचना आणि समितीने सुचवलेल्या जागांवर फेरीवाला झोन तयार करणे ही हॉकर्स संघटनेची मागणी होती. मात्र पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. अनुकुल फेरीवाला झोनसाठी सातारा पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग यांची तातडीने संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली.
पोलिस ठाण्यात बैठक
गुरुवारी सकाळी अतिक्रमण काढत असताना गोंधळ झाल्यानंतर मोहिम बारगळली. पोलिसांनी पुढे येवून भूमिका घेत लगेच बैठक घेण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या आवाहानाला हॉकर्स, बांधकाम विभाग, वाहतुक विभागाने प्रतिसाद दिला. दुपारी ५ वाजता शहर पोलिस ठाण्यात बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत हॉकर्स संघटनेने आम्हाला जागा उपलब्ध करुन द्या, अशी भूमिका मांडली. पालिकेने त्यासाठी वेळ मागितला. सुमारे अडीच तास बैठक सुरु होती. अखेर पुढील आठवड्यामध्ये याबाबत बैठक घेवून धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |