सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण पुढील अडिच वर्षांसाठी पुन्हा खुल्या प्रवर्गासाठीच पडले असून त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अध्यक्षपदासाठी कराड तालुक्यातील मसूर गटाचे सदस्य मानसिंगराव जगदाळे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. अडिच वर्षांपूर्वीही आरक्षण सर्वसाधारण (पुरूष) अर्थात खुल्या प्रवर्गासाठीच पडले होते. त्यावेळी संजीवराजे नाईक - निंबाळकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. त्यावेळीही मानसिंगराव जगदाळे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार होतेच. पण त्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांचे भक्कम पाठबळ मिळाल्यामुळे जगदाळे यांची संधी हुकली होती.
कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीला व आमदार बाळासाहेब पाटील यांना प्रथमपासून मजबुतीने ताकद देणारा खंदा कार्यकर्ता अशी जगदाळे यांची जिल्ह्यात ओळख आहे. जिल्हा परिषदेतही त्यांनी उठावदार कामगिरी केली आहे. त्यांचा कामकाजाचा अनुभवही चांगला आहे. पण तरीही संधी न मिळाल्यामुळे कराड तालुक्यातील व विशेषत: मसूर भागातील कार्यकत्र्यांचा हिरमोड झाला होता. आता पुन्हा खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने जगदाळे यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर १९६२ ते १९६७ या कालखंडात स्व. यशवंतराव चव्हाण यांचे सहकारी, स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब पार्लेकर यांच्या रूपाने कराड तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर आजतागायत कराड तालुक्याला ही संधी मिळालेली नाही. त्यामुळे यावेळी कराड तालुका अध्यक्षपदासाठी प्रचंड आशावादी आहे. त्याचवेळी विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाला मुदतवाढ मिळावी अशी मागणीही पुढे येताना दिसत आहे. जिल्ह्या मागील पाच - सात वर्षात भाजपने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्या पाश्र्वभूमीवर आधी ज्यांना मिळाले आहे त्यांनाच राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा संधी देणार, की नव्या चेहऱ्यांना ताकद देणार याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या ६४ असून सभागृहात एकट्या राष्ट्रवादीचे ३९ सदस्य आहेत. याव्यतिरिक्त काँग्रेसचे ७, भाजपचे ६, शिवसेनेचे २, सातारा विकास आघाडी ३, कराड विकास आघाडी ३, पाटण विकास आघाडी १ व अपक्ष २ असे बलाबल आहे. जावली तालुक्यातील कुडाळचे भाजपचे सदस्य दीपक पवार यांनी अलीकडेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत प्रवेश करून सातारा - जावलीतून विधानसभेची निवडणूक लढवली. आता कुडाळ गटात पोटनिवडणूक होणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |