सातारा : शिक्षणमाता सावित्रीमाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यात अनेक कर्तबगार महिलांनी गुणवत्तेच्या आधारावर आपला ठसा जनमानसात उमटवला आहे. नागठाणे माहेर असलेल्या मंगला साळुंखे यांच्या शिक्षणात 26 वर्षांचा खंड पडूनही त्यांनी मोठ्या जिद्दीने अभ्यास करुन सोलापूर विद्यापीठातून पीएच डी (प्राकृत) डॉक्टरेट मिळवली आहे. इ.स. 900 साली प्राकृत रचनाकार आचार्य हरिभद्र सुरी यांच्या साहित्यातील ‘स्त्री जीवन’ या विषयाचा त्यांनी अभ्यास केला आणि अथक प्रयत्नानंतर त्यांना त्यात यश मिळाले आहे.
सोलापूर विद्यापीठ अंतर्गत वॉलचंद कॉलेज ऑफ आर्टस् ऍण्ड कॉमर्सचे प्राकृत संस्कृत विभाग प्रमुख डॉ. महावीर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य हरिभद्र सुरी या प्राकृत रचनाकाराच्या स्त्री जिवनाबद्दल असलेल्या साहित्यसंपदा व ग्रंथाचा त्यांनी अभ्यास करुन सोलापूर विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विलास साबळे यांनी विवाहानंतर आपल्या पत्नीला पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर घौडदौड करण्याची संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळे शेतात राबणार्या शेतकरी कुटूंबातील मंगला साळुंखे-साबळे यांच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी कायमस्वरुपी बहाल झालेली आहे. 1985 ते 2011 त्यांना शिक्षण घेता आले नाही. त्यावेळी सातारा आणि कोल्हापूर विद्यापीठात एम.ए आणि पीएच डी पदवीचा अभ्यासक्रमच उपलब्ध नव्हता. पण वेळ न दवडता उत्कृष्ट शेती करुन त्यांनी उत्कृष्ठ शेतीसाठीचा खरीप ज्वारी पीक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकाचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारही प्राप्त केला होता. त्याचवेळी वीद्यापीठाला अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली व त्यांनी यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सह प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. दोन मुली व 1 मुलगा यांनाही पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन शासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत ठेवले आहे. शेती, शिक्षण आणि संसार अशा तिनही आघाड्यांवर त्यांनी यश संपादन करुन भावी पिढीला प्रेरणा दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील मुलींनी उच्च शिक्षणाची कास धरुन आपल्या गुणवत्तेला वाव द्यावा, आयुष्यभर माणूस विद्यार्थी म्हणून वाटचाल करीत असतो. शिक्षण घेण्यासाठी कोणतीही वयाची अट नाही, हे त्यांनी सिद्ध करुन दाखविले आहे. शिवथर, ता. सातारा येथील शिवारात ज्वारी काढण्यापासून ते भाजीपाला उत्पादन करण्यापर्यंत त्यांनी कष्टाची कामे केली आहेत. तसेच वेळ मिळेल त्यावेळी अभ्यास करुन पदवी मिळवली आहे. भविष्यात अनेक पदव्या मिळविण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रियाताई सुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |