11:58pm | Jun 24, 2018 |
सातारा : कास रस्त्यावरील देवकल ता.सातारा येथे लुटमार करणार्या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली आहे. अक्षय नाथाजी गुजर (वय 22) व सोमनाथ शिवाजी जाधव (वय 22, दोघे रा.फडतरवाडी ता.सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे असून या दोघांनी आणखी लुटमार केली असल्याची शक्यता असून त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेे. दरम्यान, लुटमारीची घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासात ओपन केला.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा लुटमार, जबरी चोर्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवार दि. 23 जून रोजी तीन युवक कासला निघाले होते. यावेळी संशयित दोघांनी त्यांचा रस्ता अडवून लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने 1 हजार रुपये, मोबाईल, चांदीची अंगठी असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. कास येथील फिरायला जाणार्या पर्यटकांवर हल्ला झाल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसामोर निर्माण झाले होते.
तालुका पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करुन गस्त घातली असता संबंधित दोन संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर लुटमार प्रकरणात संशयितांचे वर्णन जुळत असल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. अवघ्या 24 तासात पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा ओपन केला.
पोनि पी.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जाधव, पोलिस हवालदार सुहास पवार, रमेश शिखरे, विकास मराडे, दिपक पोळ यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |