कराड : सैदापूर-विद्यानगर आणि मलकापूर येथील आठ नेट कॅफेंवर येथील निर्भया पथकाने सोमवारी छापे मारून कारवाई केली. दरम्यान, नेट कॅफेसह, कॉफी शॉप, चॉकलेट हाऊसची तपासणी करून मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. निर्भया पथकाकडून सातत्याने अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे उपनिरीक्षक रूपाली चव्हाण यांनी सांगितले.
कराड शहरासह मलकापूर, सैदापूर परिसरात असलेल्या नेट कॅफेंसह कॉफी शॉप, चॉकलेट हाऊसमध्ये पार्टीशन केले आहे. महाविद्यालयीन युवक युवतींसह प्रेमीयुगुल तेथे अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या संदर्भात राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी अशा कॅफे व शॉपवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना दिले होते.
त्यानुसार ढवळे यांनी निर्भया पथकास कारवाईची सूचना केली होती. सोमवारी दिवसभर निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, हवालदार अतुल देशमुख, महिला हवालदार खवळे यांच्यासह पोलिसांनी कारवाईची मोहिम राबवली. विद्यानगर, ढेबेवाडी फाटा येथील कॅफेंवर कारवाई करण्यात आली. विद्यानगर येथील सर्वच कॉफी शॉप, नेट कॅफेवर छापे टाकल्याची माहिती उपनिरीक्षक चव्हाण यांनी दिली. कॉपी टू पॉईंट झिरो, मुनलाईट कॉपी शॉप, कृष्णा घाटावरील सेव्हन वन कॉफी शॉप, ढेबेवाडी फाट्यावरील ड्रीम सायबर कॅफेचा छापे टाकण्यात आलेल्यामध्ये समावेश आहे. कारवाईची मोहिम सुरूच असून तेथे सापडणारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |