12:11am | Sep 02, 2018 |
सातारा : पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सातारा शाखेच्या उद्घाटनासाठी आज सातारा शहरात आले होते. यावेळी खा. उदयनराजे आमच्याबरोबर असतील तर आमच्यासारख्या भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित होतो, असे प्रशंसोद्गार काढून ना. बापट यांनी खा. उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याचे आवतण दिले.
पोस्ट विभागामार्फत नव्याने सुरु करण्यात आलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयाचे लोकार्पण आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. बापट यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये चौफेर फटकेबाजी करीत खा. उदयनराजे आमच्याबरोबर असतील तर आमच्यासारख्या भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित होतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाबाबत सस्पेन्स वाढलेला आहे. दरम्यान, खासदार उदयनराजेंनीही बापट यांचे वक्तव्य फारसे जिव्हारी न लागू देता सातार्याचे तुम्ही खूप कौतुक केले आहे. ना. बापट पुणे महापालिकेला उभे असताना त्यांच्या निवडणुकीची पत्रके मी वाटली होती. त्यांनी लोकसभेची आगामी निवडणूक सातारा मतदारसंघातून लढवली तर मी माघार घेईन, अशी दिलदार ऑफर ना. बापट यांना दिली.
खा. उदयनराजेंसोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यामुळे मला धन्य झाल्यासारखे वाटत आहे. आज खा. उदयनराजे आणि ना. गिरीष बापट यांच्या शाब्दिक जुगलबंदीमुळे मात्र सातार्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये सुंदोपसुंदी सुरु आहे. अनेक राष्ट्रवादीजन खा. उदयनराजेंच्या विरोधात वर्जिश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे खा. उदयनराजे विरुद्ध जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी असे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, आजच्या कार्यक्रमानंतर खा. उदयनराजेंचे ‘वजन’ अधिकच वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.
शासकीय विश्रामगृहावर खलबते
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या कार्यक्रमाच्या काही तास अगोदर खा. उदयनराजे आणि मंत्री गिरीष बापट यांच्यामध्ये काही काळ खलबते झाली. मात्र, या चर्चेचा तपशील या दोघांव्यतिरिक्त कोणालाही समजला नाही. यावेळी शासकीय विश्रामगृहावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांसह खा. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांची फौज नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत होती.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |