12:32am | Apr 09, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून छाननीनंतर उरलेल्या अकरा उमेदवारी अर्जांपैकी दोघांनी अर्ज मागे काढून घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात नऊ उमेदवार उरले असून निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उमेदवारांची संख्या निम्म्यावर आली आहे. सातारची लढत महायुती व महाआघाडीने प्रतिष्ठेची केल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
लढतीत नऊ उमेदवार असले तरी मुख्य लढत काँग्रेस - राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले व शिवसेना - भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीने होणार आहे. सन २०१४ च्या लोकसभेवेळी साताऱ्यातून ऐकून १८ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यावेळी ही संख्या ९ वर आली आहे.
दरम्यान, निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप केले. यामध्ये उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह याप्रमाणे : श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) घड्याळ, नरेंद्र आण्णासाहेब पाटील (शिवसेना) धनुष्यबाण, आनंद रमेश थोरवडे (बहुजन समाज पक्ष) हत्ती. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या व्यतीरिक्त नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली चिन्हे अशी : दिलीप श्रीरंग जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) वातानुकुलन यंत्र, सहदेव केराप्पा ऐवळे (वंचित बहुजन आघाडी) कपबशी. इतर उमेदवारांना मिळालेली चिन्हे याप्रमाणे : अभिजीत वामनराव बिचुकले (अपक्ष) - दूरदर्शन संच, पंजाबराव महादेव पाटील (अपक्ष) जेवणाचे ताट, शैलेंद्र रमाकांत वीर (अपक्ष) चालण्याची काठी आणि सागर शरद भिसे (अपक्ष) शिट्टी.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |