01:42am | Oct 08, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी माघार घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे उमेदवार, मावळते खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासह ऐकून सातजण उरले आहेत. दरम्यान पुरूषोत्तम जाधव यांनी महायुतीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून आज ३५ अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ७३ उमेदवार राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा जागेची पोटनिवडणूक होत आहे. येथील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात माजी खासदार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले आहे. छाननीनंतर उरलेल्या आठ उमेदवारी अर्जांपैकी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे आता उदयनराजे, श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत खंडाईत, अपक्ष बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले, दीपक उर्फ व्यंकटेश्वर महास्वामीजी, शिवाजी जाधव, शिवाजी भोसले असे सातजण निवडणुकीच्या मैदानात उरले आहेत. मात्र मुख्य अटीतटीची लढत उदयनराजे व श्रीनिवास पाटील यांच्यातच होणार आहे.
जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागांसाठी छाननीनंतर उरलेल्या १०८ उमेदवारांपैकी ३५ अर्ज मागे घेण्यात आले असून आता निवडणुकीच्या रिंगणात ७३ उमेदवार राहिले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण मतदारसंघात ६ अर्ज मागे घेतल्यानंतरही रिंगणात जिल्ह्यात सर्वाधिक १३ उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्यात येथे चुरशीचा मुकाबला आहे. साताऱ्यात आठपैकी २ अर्ज मागे घेण्यात आले असून रिंगणात ६ उमेदवार राहिले आहेत. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले व राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्यात या ठिकाणी लक्षवेधी लढत पहायला मिळणार आहे. फलटणमध्ये १६ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून रिंगणात ११ उमेदवार राहिले आहेत. वाईत १३ पैकी तिघांनी माघार घेतली असून रिंगणात १० उमेदवार आहेत. कराड उत्तरमध्ये ११ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून ६ जण निवडणूक लढवत आहेत. कोरेगाव मतदारसंघात १२ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून ७ जण रिंगणात आहेत. पाटणमध्ये १३ पैकी ४ अर्ज मागे घेण्यात आले असून ९ उमेदवार रिंगणात आहेत. माणमध्ये १६ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकारांना दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |