कराड : मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत परिवर्तन अटळ असून, मलकापूरच नव्हे तर येत्या काळात कराड दक्षिणवरही भाजपाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने बघत असतील, तर त्यांनी तीही सोडून द्यावीत. कारण आता येत्या विधानसभेला त्यांनाही घरी बसविण्याचा चंग कराड दक्षिणच्या जनतेने बांधला आहे, अशी चौफेर टोलेबाजी करत नामदार डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मनोहर शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मलकापूर पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या प्रचार शुभारंभ सभेत ते बोलत होते. मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते होते.
मलकापूर (ता. कराड) येथील लक्ष्मी चौकात आयोजित भाजपाच्या प्रचार शुभारंभ सभेला मलकापूरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. डॉ. सारिका प्रशांत गावडे, शेतीमित्र अशोकराव थोरात, विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महादेव पवार, माजी नगराध्यक्ष आबा गावडे आदी मान्यवर होते.
मलकापूरातील सत्ताधारी कॉंग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या कारभाराचे वाभाडे काढत नामदार डॉ. भोसले यांनी अत्यंत कठोर शब्दात टीका केली. रेठरे बुद्रुक, मुंढे, गोळेश्वरसह कराड दक्षिणमधील 51 गावांसाठी भाजप सरकाच्या माध्यमातून नळपाणी योजना मंजूर करवून आणली असून, त्यासाठी कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद शासनस्तरावर करण्यात आली आहे. अनेक रस्त्यांना दर्जोन्नती देत, त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेला निधी बघवत नसल्याने विरोधकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे ते आता विकासाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी ज्या कृष्णा हॉस्पिटलमुळे मलकापूरचा उत्कर्ष झाला त्या हॉस्पिटलच्या कराचा मुद्दा उपस्थित करत आहेत. पण ते हे विसरत आहेत, की ज्या कृष्णा हॉस्पिटलवर ते टीका करत आहेत, त्याच संस्थेमध्ये स्वत:च्या मुलीला ऍडमिशन मिळविण्यासाठी कितीदा उंबरे झिजवले तेही त्यांनी सांगावे, असे म्हणत मनोहर शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागली.
मलकापूरातील सत्ताधार्यांनी आत्तापर्यंतच्या तिन्ही जाहिरनाम्यात झोपडपट्टी निर्मूलनाचे आश्वासन देत गोरगरीब जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले आहे. सत्ताधार्यांनी लबाडीवर उभारलेला हा डोंगर लवकरच कोसळणार असल्यानेच ते बिथरले आहेत. येत्या निवडणुकीत त्यांचा हिशोब तर लावूच; शिवाय त्यांची दुकानदारी बंद पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणार्या योजनेतून सर्व झोपडट्टीधारकांना पक्की घरे देण्याचे काम केवळ भाजपाच करेल, अशी ग्वाही नामदार डॉ. भोसले यांनी दिली.
आमदार पथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोचरी टीका करताना मदनराव मोहिते म्हणाले, की आजपर्यंत तुमच्या घरात खासदारकी, आमदारकी, मुख्यमंत्रीपद अशी सत्ता होती. पण तुम्ही काय उजेड पाडलात? सामान्य जनतेसाठी काहीही न करता केवळ दिल्लीतील राजकारण करत बसला. मी सोबत नसतो तर तुम्ही आमदार तरी झाला असता का? काम संपले की लोकांना सोडून द्यायचे ही तुमची वृत्ती असून, स्वत:च्या नेतृत्वाखाली कराडमध्ये निवडून आलेल्या लोकांनाही तुम्ही गमावून बसला आहात, अशी टीका करत मलकापूरच्या आणि कराड दक्षिणच्या विकासाचे व्हिजन अतुलबाबांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला खंबीर पाठबळ देण्याची भूमिका घेतली असल्याचे श्री. मोहिते यांनी स्पष्ट केले.
कृष्णा हॉस्पिटलबाबत विरोधकांनी केलेल्या शेरेबाजीला उत्तर देताना कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा हॉस्पिटलमुळे मलकापूरला केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर जगभरात एक नवी ओळख मिळाली आहे. सर्वसामान्यांना सेवा देणे हा कृष्णा हॉस्पिटलचा उद्देश असून, गेल्या वर्षभरात सुमारे 10,000 जणांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. मलकापूरातील असंख्य लोकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. असे असतानाही आम्ही कर भरला नाही, असा डांगोरा पिटला जातोय, तो निव्वळ खोटा आहे. वास्तविक मलकापूरात सर्वाधिक कर भरणारी संस्था म्हणून कृष्णा समूहाची शासनदप्तरी नोंद आहे. वैयक्तिक आकसातून टीका करणार्या विरोधकांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नसून, मलकापूरात सत्ताबदल निश्चित असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
शेतीमित्र अशोकराव जाधव यांनी आपल्या भाषणावेळी स्टेजवरून कागदपत्रांनी भरलेल्या फाईल्स दाखवित मलकापूरातील सत्ताधार्यांचा भ्रष्ट कारभारचा पाढा वाचला. यावेळी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मलकापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे, इसाक मुजावर, संदीप मोहिेते, ऍड. चंद्रकांत देसाई, आनंदराव मोहिते, सुधाकर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मलकापूरमधील भाजपा व मित्रपक्षांचे उमेदवार मनिषा शिंदे, नितीन काशीद, नुरजहॉ मुल्ला, विक्रम चव्हाण, मनोज येडगे, उमा शिंदे, अवंती घाडगे, सुहास कदम, भास्कर सोळवंडे, शोभा यादव, दिनेश नार्वेकर, पूनम जाधव, प्रज्ञा दरागडे, निर्मला काशीद, अजित थोरात, अश्विनी हिंगसे, स्वाती पवार, शामराव शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |