07:00pm | Jan 13, 2020 |
सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल शिवछत्रपतींच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाबद्दल कालच राज्यसभेचे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितले होते. त्याच धर्तीवर माजी खा. उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी संजय राऊतांना ठाकरी शैलीत अरेरेऽऽ हे कसले ठाकरेऽऽ, हे तर मोघलांचे चाकरे, असे प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का? अशी विचारणा करीत नैतिकता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तत्काळ आपल्या पदांचे राजीनामे द्यायला हवेत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. विनाकारण शिव छत्रपतींच्या वंशजांना या राजकारणात गोवून संजय राऊत आपले महत्त्व वाढवित आहेत. याबाबत संजय राऊतांच्या जिभेला लगाम घालून त्यांना समज देण्यात यावी, अशापद्धतीची मागणी खा. संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. आज सकाळी सातारा-जावलीचे आमदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजेंनीही आपली भूमिका स्पष्ट करीत ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक तातडीने थांबवावे तसेच काही अतीउत्साही कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार घडल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया देत ‘त्या’ पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती घेवूनच बोलेन, असे माध्यमांशी बोलताना सांगितले असले तरी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी मात्र आज सकाळपासूनच शिवसेना, उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांच्याबाबत सोशल मीडियावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे.
याबाबत राजे प्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष घाडगे व उदयनराजेंचे निकटवर्तीय संग्राम बर्गे यांनी सातारा टुडे शी बोलताना तिखट प्रतिक्रिया दिली असून काही वर्षांपूर्वी छ. उदयनराजेंनी भाजपातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी ‘सामना’मध्ये अरेरेऽऽ छत्रपती मोघलांना मिळाले, असा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. परंतु सत्ता माणसाची नितीमत्ता भ्रष्ट करते त्याला शिवसेनाही अपवाद नाही. स्वत:चे ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून, अशी दुटप्पी नीती शिवसेनेने प्रथमपासूनच अवलंबलेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला औरंगजेबाच्या औलादी म्हणणार्या शिवसेनेने अखेर आपली नीतीमत्ता गुंडाळून ठेवत औरंग्याच्याच औलादीबरोबर संसार थाटत त्यांच्याशी सोयरिक केलेली आहे. लायकी नसताना संजय राऊत हा माणूस सातत्याने शिव छत्रपतींच्या वंशजांबद्दल गरळ ओकत आहे. ज्या शिवसेनेची सुरुवात शिव छत्रपतींच्या नावापासून झाली, त्यांच्याच नावावर मतांचा जोगवा मागून शिवसेना दोनवेळा राज्यात सत्तेवर आली आहे. वास्तविक जे पुस्तक भाजप कार्यकर्त्यांकडून प्रसिद्ध झाले आहे, त्याच्या तोंडाला काळे फासायचे सोडून आज छत्रपतींच्या नावावर आंदोलने व राजकारण करणारी शिवसेना शिव छत्रपतींच्या वंशजांकडे बोट दाखवून त्यांना राजीनामा द्यायला सांगत आहे. खरेतर त्यांच्या वंशजांनी काय करायचे, ते त्यांचे ते ठरवतील. त्याबाबत बोलण्याचा शिवसेना वा त्यांच्या वाचाळवीर नेत्यांना नैतिक अधिकार नाही. तुमच्यात याविषयी आंदोलन करण्याची धमक नसल्यानेच तुम्ही अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहात. भविष्यात शिव छत्रपतींच्या वंशजांबद्दल तुम्ही गरळ ओकाल तर तुम्हाला तुमच्याच स्टाईलने सातारी हिसका दाखवला जाईल, असा इशाराही संतोष घाडगे व युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |