कराड : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर पसरत आहे. आपल्या देशातही साडे सहा हजारांवर कोरोनाग्रस्थ आहेत तर महाराष्ट्रात हा आकडा 1300 च्या जवळ पोहचला असताना आपल्या सातारा जिल्ह्यात 6 जण कोरोना बाधित आहेत. अश्या परिस्थितीत पोलीस प्रशासन, डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, आशा तसेच अंगणवाडी सेविका असे सर्वच जण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत कि कोरोनाग्रस्थांचा आकडा लवकरात लवकर नियंत्रणात यावा. यासाठी लोकांनी घरात राहणे अत्यंत गरजेचे असताना लोक काही ना काही कारणाने घराबाहेर पडताना दिसत आहेत. याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः मतदारसंघातील गावागावात जाऊन जनतेशी लाऊड स्पीकरद्वारे संवाद साधत जनजागृती करत आहेत.
देशात लॉकडाउन असताना आणि सर्वत्र संचारबंदी असताना लोकप्रतिनिधींनी काय भुमिका बजावावी असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यापार्श्वभुमीवर आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींसमोर आदर्श घालून दिला आहे. चव्हाण यांनी मतदार संघातील वाड्यावस्त्यांवर जाऊन ध्वनीक्षेपणावरुन कोरोनाबाबत नागरिकांत जागृती केली आहे. कोरोना विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण फिल्डवर उतरुन लढत असल्याने आता त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. कराड तालुक्यातील ग्रामीण भागात काही कोरोनारुग्ण सापडल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. मात्र चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन नागरिकांना धीर दिला आहे.
याचसोबत आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेला संवादाद्वारे संदेश दिला कि, कोरोनापासून बचावासाठी कोण-कोणती काळजी घेणे गरजेचे आहे हे सांगितले. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे कारण ते आपल्यासाठी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडलेले आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात घरात बसणे जरी कठीण असले तरी स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीवासाठी आपल्याला घरी राहणे गरजेचे आहे असे कळकळीचे आवाहन आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी या संवादाद्वारे जनतेला केले. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, नरेंद्र पाटील, पै.तानाजी चौरे, नितीन थोरात तसेच युवा नेते इंद्रजीत चव्हाण आदी उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |