02:27am | Jan 11, 2020 |
कराड : भुमि अभिलेख कार्यालयात कर्मचार्यांना सावळा गोंधळ सुरू असून या कर्मचार्यांनी आपल्या कामात सुधारणा न केल्यास भुमिअभिलेख कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रांताधिकारी अनंत दिघे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत कराड भुमिअभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ चालु आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. कार्यालयात कोणीही कुठल्याही टेबलला रेकार्ड बघत असतो. ते हाताळताना इतर लोकांचे कागदपत्रे गहाळ किंवा नुकसान होतात. शेतकर्यांनी मोजणीबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. कर्मचारी चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. किरकोळ काम जरी असले तरी अनेक महिने कामेच होत नाहीत. येथील कर्मचारी शेतकर्यांकडे सरळ-सरळ पैशाची मागणी करतात व पैसे नाही दिले तर त्या शेतकर्याची कामे जाणूनबुजून लवकर करत नाहीत. शेतकर्यांना नाहक कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. कराड भुमिअभिलेख कार्यालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. मागील काही महिन्यात एकाच महिन्यात दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पैसे घेताना रंगेहाथ सापडले होते.
भुमी अभिलेख कार्यालयाशी शेतकर्यांचा वारंवार संबंध येत असतो. यामध्ये शेतकर्यांची मोजणीची प्रकरणे असतील, शेतजमिनीच्या वाटण्या असतील, सिटी सर्व्हे नोंदी असतील अशी अनेक कामे घेऊन शेतकरी या कार्यालयात येत असतो. वयस्कर शेतकरी, महिला शेतकरी यांना वारंवार हेलपाटे मारूनही त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. येथील कर्मचार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्यांना मानसिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. टेंभू येथील धरणामुळे काही बाधित शेतकर्यांना मोजणी न झाल्यामुळे अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. भुमि अभिलेख कार्यालयातील कर्मचार्यांच्या भोंगळ कारभाराचा सर्वसामान्य शेतकर्यांना फटका बसत आहे. या कर्मचार्यांनी आपल्या कामात सुधारणा न केल्यास बळीराजा शेतकरी संघटना शेतकर्यांना बरोबर घेऊन या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करेल असा इशारा संघटनेने या निवेदनात दिला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार नेते अनिल घराळ, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, कराड तालुका कार्याध्यक्ष नजीर पटेल, सचिन पवार, अमोल पवार व शेतकरी उपस्थित होते.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |