सातारा : साताऱ्यातील रनर्स ग्रूपने आयोजित केलेल्या सातारा ते पंढरपूर धावती वारीला तालीम संघ सातारा येथून भक्तीमय वातावरणातून पहाटे ६ वा. प्रारंभ झाला.
मेरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटू वारकरी झाल्याने उपस्थितीतांनी अचंबित होत उत्साहात दाद दिली. आषाढी एकादशीला श्री.पांडुरंग-रखमाई यांचे धावतच दर्शन घेतले जाणार आहे.पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेले धावपटू यांचे अनेक ठिकाणी स्वागत केलं जात आहे. विठ्ठल-विठ्ठल चा जयघोष व टाळ्यांचा गजर करीत हे धावपटू निघाले आहेत. जागोजागी नागरिकांनी कम आॕन, किप ईट अप, अशा घोषणा देत व टाळ्या वाजवत धावपटू यांचा उत्साह वाढवीत आहेत. या मेरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी शहरासह तालुक्यातील धावपटुंनी भाग घेतला आहे. प्रथमच हा अनोखा धार्मिक उपक्रम राबविल्याने अनेक ग्रामस्थ भारावून गेले होते . या मार्गावर संयोजकांच्या वतीने पाणी, एनर्जी ड्रिंक तसेच फुडसहा मेडिकलची सोय करण्यात आली आहे.
आषाढी वारीसाठी साताराहून पंढरपूरकडे निघालेल्या धावती वारीचा सोहळा लोणंद-फलटण-नातेपुते-माळशिरस-वेळापूरे येथून मार्गक्रमण करित गेला आहे .सुमारे १४० कि.मी. धावत धावपटू सोमवारी ९वा. पंढरपूर येथे पोहचणार आहेत. विठ्ठलाशी एकरूप पांडुरंगाचे दर्शन घेऊन सर्वजण फिट अँण्ड स्ट्राँग राहू दे, असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातलणार आहेत. या अनोख्या सोहळ्याचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात आले. या धार्मिक उपक्रमाने एक प्रकारे इतिहासाला उजाळा मिळणार आहे. दरम्यान, जावळी तालुक्यातील प्रति पंढरपूर करहर याठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मोठा भक्तीचा मेळा भरत आहे. येथील भक्तांसाठी दरवर्षी ह भ प दत्तात्रय कळंभे महाराज जावळी सहकारी बँक व अनेक संस्था उपवासाचे फराळ मोफत वाटप करीत असतात, अशी माहिती अशोक चव्हाण, संजय पवार यांनी दिली आहे. तसेच सातारा पंढरपूर धावती वारीत सहभागी झालेले रामसिंग, संदिपभाऊ शिंदे, राजेंद्र गायकवाड, नवनाथ डिगे, डॉ. सुधिर पवार, पत्रकार पांडुरंग पवार, बाळू मोरे, सुभाष भोसले , सुनिल पानसे, सचिन जाधव, विनय रावखंडे, निरंजन पिसे, डॉ. दत्तात्रय तावरे, रविंद्र जानकर, सचिन केंजळे याचे कौतुक केले आहे.
- अजित जगताप
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |