सातारा : सातारा शहरालगत महामार्गावरील वाढे फाटा येथे बुधवारी सांयकाळी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात छाया शिवाजी कदम (वय 60, सध्या रा. सातारा, मूळ रा.अनपटवाडी ता.कोरेगाव) ही महिला जागीच ठार झाली. गावी वटपौर्णिमेचा सण साजरा करुन मुलासोबत जाताना ही दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सौ. छाया कदम यांचे मूळ गाव अनपटवाडी असून सध्या कुटुंबियासोबत त्या सातारामध्ये राहत आहेत. बुधवारी वटपौर्णिमेचा सण असल्याने व शेतातील कामे असल्याने त्या गावी गेल्या होत्या. वटपौर्णिमा साजरी केल्यानंतर त्या मुलगा सुरज कदम सोबत (एमएच 11 सीए 3960) या दुचाकीवरुन अनपटवाडीहून साताराकडे येत होत्या.
दुचाकी वाढे फाटा येथे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर त्याचवेळी (एम एच 11 एम 3951) हा ट्रक लोणंदकडे निघाला होता. दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर हा अपघात झाला. अपघातामध्ये सौ.छाया कदम या दुचाकीवरुन पडल्यानंतर त्यांच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली. डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाल्याने सुरज कदम याला भोवळ आली. अपघातामुळे परिसरातील वाहतुक ठप्प झाली.
अपघाताची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतुक सुरळीत करुन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला.
दरम्यान, सौ.छाया कदम यांनी बुधवारी सकाळी वटपौर्णिमेनिमित्त पूजा केली होती. शेतातील काम असल्याने त्या तिकडे गेल्या होत्या. साताराकडे परत येत असतानाच अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |