01:53am | Sep 03, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील राज्य शासनाची सर्व प्रशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आदी सर्व प्रशासकीय कार्यालये कोरेगाव-रहिमतपूर राज्य मार्गावरील कोरेगावच्या सुभाषनगर परिसरातील बंद पडलेल्या मॅफको कारखान्याच्या शासनाच्या मालकीच्या साडे अकरा एकराच्या जागेत एकत्रित बांधण्याच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान, ही कार्यालये बांधण्यासाठी भाजपा-शिवसेना आघाडीच्या सध्याच्या शासनाने दीड कोटीचा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याने कोरेगाव तालुक्यातील प्रशाकीय इमारत उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत कोरेगाव तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय कार्यालयाशी संर्पक साधला असता कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय सुभाषनगर परिसरातील बंद पडलेल्या मॅफको कारखान्याच्या शासनाच्या मालकीच्या साडे अकरा एकराच्या विस्तीर्ण जागेत उभे राहणार असल्याचे समजले. या कार्यालयासाठी 2013 साली आ. शशिकांत शिंदे यांच्या आमदारकीच्या काळात शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयाच्या इमारतीला शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे समजताच त्यावेळी राज्य शासनाच्या सत्तेत सहभागी असणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कोरेगाव तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी जागेचा वाद उकरून प्रशासकीय कार्यालयाची इमारत आहे त्याच जागेत उभी राहवी. नवीन जागेत जाऊ नये म्हणून काँग्रेस नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देवून मॅफको कारखान्याची शासनाची विस्तीर्ण जागा कृषी संबंधीच्या उपक्रमासाठी आरक्षित ठेवली. त्यामुळे 2013 साली प्रशासकीय मंजुरी मिळूनही 2018 पर्यंत कोरेगाव तालुका प्रशासकीय कार्यालयाची प्रशस्त इमारत रखडली गेली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इमारती संबंधिच्या जागेच्या वादामुळे प्रशाकीय कार्यालयाची इमारत 2013 साली मंजुरी मिळूनही तब्बल पाच वर्षे रखडली. आ. शिंदे यांनी मंजुरी आणूनही इमारतीच्या जागेचा वाद काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्माण केल्याने तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा दिल्याने शासनाचा निधी मिळाला नाही. त्यामुळे मंजुरी मिळूनही पाच वर्षे इमारत उभी राहिली नाही.
सन 2014-2015 साली राज्यात आणि केंद्रात सत्ता बदल झाला. राज्यात भाजपा-सेना आघाडीचे तर केंद्रात भाजपा आघाडीचे शासन आले. 2013 मंजुरी मिळालेल्या कोरेगाव तालुक्याच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीला त्यावेळी खर्चाच्या बजेटनुसार 11 कोटीचा निधी अपेक्षित आहे. भाजपा-शिवसेनेच्या राज्य शासनाने एक कोटी 50 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी दोन वर्षाच्या कालावधीत टप्याटप्याने मिळणार आहे. दोन वर्षाच्या कालावधीत ही प्रशासकीय इमारत उभी करावयाची आहे.
येत्या दोन वर्षात प्रशस्त दोन मजली भव्य प्रशासकीय इमारतीचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे. दोन महिन्यात प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे टेंडर निघणार असून मॅफको परिसरातील विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत दोन वर्षात ही इमारत उभी राहणार आहे.
या कोरेगाव प्रशासकीय इमारतीसह याच परिसरात जिल्हा परिषद, कोरेगाव पंचायत समिती, कोरेगाव पोलीस स्टेशन आदी विविध विभागांच्या शासकीय कार्यालयासाठी काही एकर मोकळी जागा राखून ठेवण्यात येणार आहे.
उर्वरित विस्तीर्ण जागेमध्ये राज्य शासनाचे तहसील, प्रांत, मंडलाधिकारी, तलाठी, सहाय्यक सहकार उपनिबंधक, इरिगेशन, सार्वजनिक बांधकाम, मोजणी, रजिस्टार, तालुका कृषी ही कार्यालये नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरीत होणार आहेत आणि कोरेगाव तालुक्यातील 142 गावांच्या ग्रामस्थांची सोय होणार आहे. या इमातीमध्ये प्रशस्त पार्किंगची व्यवस्था, बागबगीचा, कर्मचार्यांसाठी निवास्थाने आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. राजकीय वादात अडकून पडलेल्या कोरेगाव प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |