नागपूर : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता असली तरी, येत्या दोन दिवसांत म्हणजे रविवारपर्यंत सरकार स्थापन करणे अवघड असल्याचे संकेत दस्तुरखुद्द शरद पवार यांनी शुक्रवारी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उद्या, रविवारी असल्याने या दिवशी सरकार स्थापन व्हावे, असे शिवसेना नेत्यांचे प्रयत्न व शिवसैनिकांची इच्छा असल्याची चर्चा आहे. मात्र, पवार यांच्या वक्तव्यामुळे हा दिवस टळणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार दोन दिवसांच्या नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी विविध घटकांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी अनौपचारिक चर्चेदरम्यान रविवार, १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन करावे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. यावर ‘दोन दिवसांत सरकार स्थापन करणे अवघड आहे’. त्यासाठी भरपूर वेळ लागेल, घाईने काही सांगता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडल्याचे कळते.
दरम्यान, मुंबईत दोन दिवसांपासून आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरबैठका सुरू आहेत. तथापि, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी पवार परत चर्चा करणार असल्याचे समजते. त्यासाठी आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. यात किमान-समान कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नव्या आघाडीला मूर्त रूप येईल. यानंतर सरकार स्थापनेचा दावा केल्यावर प्रत्यक्ष शपथविधीला वेळ लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |