नवी मुंबई : वाशीतील जागृतेश्वर तलावाजवळ सोमवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका ३४ वर्षीय पुरुषाला पाच जणांनी तेथील कांदळवनात नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी तरुण तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी व कंडोम टाकून त्याचा छळ करून पलायन केले.
या प्रकारामुळे गंभीर जखमी झालेल्या पीडित पुरुषावर कोपरखैरणे येथील खासगी रुग्णालयात तातडीने शस्रक्रिया करण्यात आली असून अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, वाशी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील पीडित पुरुष तुर्भे परिसरात राहणारा असून सोमवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे वाशीतील जागृतेश्वर तलाव घाट क्रं.२ येथे गेला होता. यावेळी तो मोबाइलवर बोलत असताना त्याठिकाणी आलेल्या २५ ते ३० वयोगटातील पाच तरुणांनी त्याला जबरदस्तीने उचलून टाटा कॉलनी व जागृतेश्वर तलाव घाटालगत असलेल्या कांदळवनाच्या झुडुपात नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी त्याच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी, कंडोम व इतर वस्तू टाकून तेथून पलायन केले.
या घटनेनंतर पीडित पुरुषाने जखमी अवस्थेत घर गाठले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला कोपरखैरणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने शस्रक्रिया करण्यात आली असून, अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर वाशी पोलिसांना एकाही आरोपीला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पीडित पुरुषाच्या मित्रांनी थेट पोलिस आयुक्त संजय कुमार यांना पत्र देऊन या गंभीर प्रकाराची दखल घेण्याची विनंती केली असून, ही घटना दिल्लीतील ‘निर्भया’प्रकरणाशी मिळतीजुळती असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |