07:15pm | Apr 04, 2020 |
सातारा : सामाजिक कार्यात आणि बांधिलकी जोपासण्यात अग्रेसर असणार्या माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशनने कोरोनाच्या साथीतही सामजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत केली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने स्थालंतरित पुरुष, महिला आणि त्यांची मुले यांच्या निवार्याची सोय केली आहे. त्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत एकवेळचे जेवण पुरवण्याची जबाबदारी माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशनने घेतली आहे. त्याप्रमाणे दररोज एकवेळचे जेवण पुरवण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांना जीवनाश्वयक वस्तूंचेही वाटप फौंडेशनमार्फत करण्यात आले.
बेंगलोर ते मध्यप्रदेश पायी प्रवास करणार्या 163 पुरुष, महिला आणि त्यांची मुले यांना सातारा जिल्हा प्रशासनाने संचारबंदीमुळे पुढे जाता येणार नाही म्हणून साता-यामध्येच त्यांच्या निवासाची सोय केली आहे. परंतु या सर्व हातावर पोट असणार्या मजुरांची जेवणाची व्यवस्था माहेश्वरी ट्रस्टमार्फत करण्यात आली. याबाबत प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर यांच्याशी संवाद साधून संचारबंदीमुळे अडकलेल्या या सर्व मजुरांची रोज एक वेळ जेवणाची व्यवस्था करण्याबाबत संस्थेने परवानगी घेतली. त्याप्रमाणे 1 एप्रिलपासून लॉकडाऊन असेपर्यंत रोज संध्याकाळचे पूर्ण जेवण सुरु केले आहे. त्याचवेळेस 165 कापडी मास्क, आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण व तेलही वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, डेप्युटी आर.टी.ओ. संजय राऊत, संकेत लेंभे, तलाठी कोळेकर, भोसले तसेच फौंडेशनचे अध्यक्ष हरीनारायण कासट, प्रकाश मंडोरे, विनोद राठी, दिलीप लोया, प्रमोद लाहोटी, दिलीपभाई शहा, नरेंद्र मिणियार, राजगोपाल चांडक, सुदीप भुट्टड, अन्नदान प्रमुख माधव सारडा उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |