किश्तवाडमध्ये भीषण अपघात; मिनीबस दरीत कोसळून २० ठार
जम्मू : जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात आज मिनीबस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २० प्रवासी ठार झाले आहेत. तर काहीजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिनीबस केशवान येथून किश्तवाडच्या दिशेने जात होती. मात्र, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बस पलटी होऊन ती दरीत कोसळली. यात २० प्रवासी जागीच ठार झाले. या सर्वांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती जम्मूचे पोलिस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी दिली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात आज मिनीबस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २० प्रवासी ठार झाले आहेत. तर काहीजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.