सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेंडसेनगरमध्ये अज्ञात युवकाने महिलेला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेली. बुधवारी भर सकाळी ही घटना घडल्यानंतर परिसर हादरुन गेला असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
विना उपचंद बाफना (वय 40, रा.पेंडसेनगर, शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बुधवारी सकाळी 7.30 वाजता विना बाफना या देवाला त्यांच्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. घरापासून जात असताना त्यांचा एका युवकाने रस्ता अडवला. या घटनेमुळे त्या घाबरल्या असतानाच अनोळखी युवकाने त्याच्याकडील धारदार चाकूसारखे शस्त्र काढले व महिलेवर रोखले. महिलेने बचावासाठी आरडाओरडा करत दुचाकीपासून बाजूला झाल्या. हीच संधी साधत अनोळखी युवकाने दुचाकी स्वत:च्या ताब्यात घेतली.
दुचाकी जबरदस्तीने चोरुन घेवून जात असताना महिलेने संशयिताला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अज्ञाताने दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेली. सुमारे 10 मिनिटे चाललेल्या या थरारानंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. परिसरात बघ्यांची गर्दी उसळल्यानंतर घडलेल्या घटनेबाबत महिलेने त्यांना सांगितले. महिलेच्या कुटुंबियांना फोन करुन त्याची माहिती देण्यात आली. बाफना कुटुंबियांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेल्या घटेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस हडबडून गेले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्याठिकाणी सीसीटीव्ही फुटेज होते. पोलिसांनी जबरी चोरीप्रकरणातील ते सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारावर संशयित चोरट्याचा शोध सुरु केला. मात्र सायंकाळपर्यंत संशयित चोरट्याचा व दुचाकीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |