04:04am | Aug 30, 2019 |
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शहरालगत ट्रॅव्हल्स चालकाला फूड ऍन्ड ड्रगचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून अनोळखी चौघांनी ट्रॅव्हल्समधील 2 लाख 16 हजार रुपये किंमतीचा खवा घेवून फसवणूक केली. याशिवाय शिवीगाळ, दमदाटी करत 5 हजार रुपये घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेे. दरम्यान, पोलिसांचे बातमीदार असल्याचे सांगून बिनधोकपणे हे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे.
संतोष पांडूरंग धारगलकर (वय 40, रा.गोवा) या ट्रॅव्हल्स चालकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चौघांविरुध्द तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 25 रोजी तक्रारदार हे जीजे 05 एव्ही 8887 ही ट्रॅव्हल्स घेवून पुणेकडे निघाले होते. या ट्रॅव्हल्समध्ये 2 लाख 16 हजार रुपये किंमतचे प्रत्येकी 30 किलो वजानाची 50 पाकीटे खवा होता. हा खवा गायत्री स्पेशल बर्फी, राधे स्पेशल बर्फी या नावाने पॅक केला होता. ट्रॅव्हल्स दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा शहरालगत खिंडवाडी येथे आल्यानंतर तेथे चौघेजण ट्रॅव्हल्समध्ये बसले.
ट्रॅव्हल्स बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आल्यानंतर संशयितांनी ट्रॅव्हल्स थांबवण्यास सांगितली. संशयितांनी आम्ही फूड ऍन्ड ड्रग्जचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांचे खबरी असल्याचे सांगून शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे ट्रॅव्हल्स चालकासह पॅसेंजर गोंधळ गेले व घाबरले. संशयितांनी 5 हजार रुपये मागून ते जबरदस्तीने घेतले. यानंतर ट्रॅव्हल्सच्या डिकीत असलेला खावा सातारा शहर पोलिस ठाण्याला जमा करतो, असे सांगून तो उतरुन घेतला. हा खवा संशयितांनी एम एच 12 जीटी 6376 या छोट्या हत्ती टेंम्पोमध्ये भरला व तेथून घेवून ते पसार झाले.
ट्रॅव्हल्स चालकाने हा सर्व प्रकार त्याच्या मालकाला व खवा मालकाला सांगितल्यानंतर तेही गोंधळून गेले. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर फूड ऍन्ड ड्रग्जच्या कोणत्याही अधिकार्यांकडून ही कारवाई करण्यात आली नसून चोरलेला खावा पोलिस ठाण्यातही जमा झाला नसल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार फसवणूकीचा असल्याचे समोर आल्यानंतर चालकाने ट्रॅव्हल्स पोलिस ठाण्यासमोर आणली. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |