12:21am | Nov 09, 2019 |
सातारा : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्याही दिवशी निकाल लागू शकतो. सातारा शहराला सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. निकालानंतर कोणत्याही व्यक्तीने, समाजाने तसेच सोशल मिडीयावर व्यक्त न होता त्यातूनच शहराची शांतता अबाधित राखावी, असे आवाहन सपोनि बाजीराव ढेकळे यांनी केले आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असल्याने सातारकरांसह संपूर्ण देशाचे त्याकडे लक्ष लागले आहे. निकाल येण्यापूर्वी व निकाल आल्यानंतर कुठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर येवू नये, यासाठी सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस सतर्क आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने निकालानंतर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करु नये. फ्लेक्स लावू नयेत. साखर वाटू नये. सामुहिक समाज पठण करु नये. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोेशल मिडीयावर अयोध्या निकालासंबंधी पोस्ट करु नये. अशाप्रकारे कोणतेही कृत्य झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते.
अयोध्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नये. या कालावधीमध्ये कोणतीही माहिती मिळाल्यास ती सोशल मिडीयावर व्हायरल न करता तत्काळ शहर पोलिसांना तसेच कंट्रोल रुमला कळवावे. सातारकरांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे. हीच पंरपरा यापुढेही जपावी व सातारकरांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सपोनि बाजीराव ढेकळे यांनी केले आहे.
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |

कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |