03:44pm | Nov 21, 2019 |
कराड : साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम लहान व अडचणीचा असणार आहे. सरकारच्या धोरणांवर साखर कारखानदारी अवलंबून असल्याने, सरकारने साखर कारखानदारीसाठी चांगली धोरणे राबवून सहकार्य करावे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, पैलवान शिवाजीराव जाधव, दिलीपराव पाटील, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील, कृष्णा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव जाधव, ‘म्हाडा’चे संचालक आनंदराव मोहिते, माजी संचालक वसंतराव साळुंखे, ऍड. बाळासाहेब पाटील, कृष्णा बँकेचे संचालक प्रमोद पाटील, पैलवान धनाजी जाधव, राजारामबापू बँकेचे संचालक संग्राम पाटील, बहेचे उपसरपंच मनोज पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सुरेश भोसले पुढे म्हणाले, साखर कारखानदारीसाठी हा काळ बिकट आहे. मागील हंगामातील साखर अजून शिल्लक आहे. बाजारात साखरेला मागणी नाही. किमान साखरेचा भाव सरकारने ठरवल्यामुळे कारखानदारीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या हंगामात सर्व घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. आम्ही दोन्हीवेळी कारखाना अडचणीत असताना सत्तेवर आलो. मात्र परिस्थितीवर मात करून सभासद हिताचे निर्णय राबविले आणि कारखान्याला ऊर्जितावस्था मिळवून दिली.
उपाध्यक्ष जगदीश जगताप म्हणाले, संचालक मंडळाचे व संस्थेचे नाते जिव्हाळ्याचे आहे. भाऊ-आप्पा यांच्या विचारांवर हे संचालक मंडळ कार्यरत आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी संस्था कशी चालवावी याचा आदर्श सहकारात घालून दिला आहे. कृष्णेची वाटचाल यशस्वी करून दाखविली आहे. गेल्या संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने कारभार केला होता. त्यामुळे कृष्णा कारखाना अडचणीत होता. पण त्यातून आपण सावरलो आहोत. आज सभासद विश्वासाने कारखान्यास ऊसपुरवठा करतात. हे सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली पारदर्शकपणे काम करणार्या संचालक मंडळाचे यश आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी प्रास्तविकात म्हणाले, महापुरामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात उसाचे नुकसान झाले असून, या भागातील तोडीला प्राधान्य दिले जाणार आहे. कारखान्याची तोडणी यंत्रणा पूर्ण सज्ज असून, यंदा कारखान्याने 11 लाख उसगाळपासह बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप व त्यांच्या पत्नी सौ. विद्या जगताप यांच्या हस्ते वरदविनायक पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. यावेळी रेठरे बुद्रुक सोसायटीचे अध्यक्ष व्ही. के. मोहिते, स्वातंत्र्यसैनिक माने गुरुजी, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के कापूरकर, बाळासाहेब पाटील, सर्जेराव पाटील, आबासो गावडे, अविनाश खरात, श्रीपती माने, रमेश लवटे, आनंदराव जमाले, कृष्णा कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, संदीप कणसे यांच्यासह सभासद शेतकरी, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक धोंडिराम जाधव यांनी आभार मानले.
तोडणीच्या तक्रारींचे तत्काळ निवारण
सभासदांना तोडणीच्या बाबतीत काही तक्रारी असल्यास त्याची नोंद कारखाना प्रशासनाकडे करावी. या तक्रारीचे निवारण कारखाना प्रशासनामार्फत ताबडतोब केले जाईल, अशी ग्वाही चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |