03:55am | Oct 13, 2018 |
सातारा : बुलेट, केटीएमसारख्या हायफाय दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अटक केली. आकिब इमाम हुसेन सय्यद (वय 24, मूळ रा.बेळगाव, कर्नाटक, सध्या रा.उंब्रज) या संशयित युवकाकडून पोलिसांनी 6 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान, संशयिताने कराड, बेळगाव व गोवासह विविध ठिकाणच्या दुचाकी चोरल्याने यामागे आतंरराज्य टोळी असण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून इतर भागातील चोरीच्या दुचाकीही जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. उंब्रज येथे अशा अनेक दुचाकी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. यामध्ये संशयित आकिब सय्यद असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर आंतरराज्य दुचाकीचोर निघाला. संशयिताने आतापर्यंत बुलेट, केटीएम, अक्टिव्हा, डिओ, मोपेड, सीडी डिलक्स अशा आठ गाड्या चोरल्याची कबुली देवून त्याची सर्व माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या सर्व दुचाकी जप्त केल्या. संशयिताला शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली आहेे. पुढील तपासासाठी त्याचा कराड पोलिसांना ताबा दिला जाणार आहे.
दरम्यान, संशयिताने कराड येथील एक दुचाकी दोन वर्षांपूर्वी चोरली असून त्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. उर्वरीत दुचाकी बेळगाव व इतर भागातून चोरलेल्या आहेत. यामध्ये आणखी काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिस तपास करत आहेत.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, पृथ्वीराज घोरपडे, उत्तम दबडे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुबीन मुलाणी, नितीन गोगावले, निलेश काटकर, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, संजय जाधव, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |