फलटण : हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर पाशवी बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेमुळे देश सुन्न झाला. देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून फलटण मध्ये सर्व नागरिकांच्यावतीने महात्मा फुले चौकात श्रद्धांजली वाहण्यात येऊन अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली.
हैदराबादमधील पशुचिकित्सक तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला. त्यानंतर तिला जाळण्यात आलं माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांनी फलटणकर नागरिकातर्फे त्या तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी महात्मा फुले चौकात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी उपस्थित फलटणकर नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना नराधमांना तात्काळ फासावर लटविण्याची मागणी केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास आमिरभाई शेख, अशोकराव जाधव, माऊली सावन्त, मेहबूबभाई मेटकरी, जमशेद पठाण, धनंजय महामुलकर, विराज खराडे, कुंदा रुद्रभटे, बजरंग गावडे, आमिरखान मेटकरी, तात्या गायकवाड, समीर तांबोळी, राजेंद्र निंबाळकर, गोविंद भुजबळ, प्रीतम बेंद्रे, प्रीतम जगदाळे, शंकर मुळीक, युवराज पवार, यशवन्त खलाटे, नसीर शिकलगार, पप्पू शेख, अनिकेत कदम, सागर नाळे यांच्यासह विविध पक्षाचे नेते मंडळी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला, फलटणकर नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |