08:30pm | Apr 02, 2019 |
सातारा: सातारा शहरातील प्रभाग २० मध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र कामाला गती नाही. पदाधिकारी व अधिकारी निवडणुकीत दंग झाले आहेत. गेले आठ दिवस झाले रस्त्यात खोदून ठेवले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाण्याची जलवाहिनी तुटली आहे. पाण्याची नासाडी होत आहे. तरीही पाणी पुरवठा विभागातील कुंभकर्णी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना जाग येत नाही. हे काम तातडीने पूर्ण केले नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा विरोधी नगर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ. लीना गोरे यांनी बोलताना दिला आहे.
लीना गोरे म्हणाल्या, की भुयारी गटर योजनेच्या कामाला आमचा विरोध नाही. पण प्रभाग २० मध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे, ते कासव गतीने सुरू आहे. या कामासदर्भात अनेकदा मुख्याधिकारी शंकर गोरे आणि पदाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या, पण कोणीही गांभीर्याने घेत नाही. भुयारी गटाराच्या चेबरसाठी आठ दिवस ठेकेदाराने खड्डा खोदून ठेवला आहे. खड्डा खोदताना पाण्याची पाईप तुटली आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. कास मधील पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तुटलेल्या पाईपलाईन मधून पाण्याचे कारंजे उडत आहेत. पाण्याची नासाडी होत असतानाही पाणी पुरवठा अधिकारी झोपा काढत आहेत का? त्यामुळे या भागातील नागरीकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच खड्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ठेकेदाराला सांगून ठेकेदार त्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. हे काम तातडीने पूर्ण केले नाही तर नाइलाजाने भुयारी गटार योजनेचे काम बंद पाडावे लागेल, असा इशारा विरोधी नगर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ. लीना गोरे यांनी बोलताना दिला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |