फलटण : सरडे ता. फलटण येथील एका शेतकऱ्याने खाजगी सावकाराकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. व्याजापोटी सुमारे १८ लाख रुपये देवून ही खासगी सावकार अजून सहा लाख रुपये संबंधित शेतकऱ्याकडून मागत होता. तसेच जबरदस्तीने जमीन लिहून घेवून मारहाण केल्याप्रकरणी अवैद्य खासगी सावकारी करणाऱ्या कुटुंबावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून फलटण तालुका जिल्हाभरात अवैध खासगी सावकारीमुळे बदनाम झालेला आहे. अवैद्य खासगी सावकारी प्रकरणी यापूर्वी फलटणमधील विद्यमान नगरसेवक, आणि खासगी सावकार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अन्वये जेल मध्ये आहेत. मात्र एवढे घडून सुद्धा फलटण काही खासगी सावकार फलटणमधील राजकीय पुढाऱ्यांच्या पाठबळावर खासगी सावकारीचा व्यवसाय करीत आहेत. सरडे ता. फलटण येथील संपत नामदेव धायगुडे, यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी सरडे ता. फलटण येथील खासगी सावकार सुरेश रामचंद्र बरकडे, बाळू रामचंद्र बरकडे, यांच्याकडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. दोन लाखाच्या बदल्यात तारण म्हणून खासगी सावकार बरकडे याने धायगुडे यांची 32 गुंठे जमिनीचे मुदत खरेदी खत केले होते.
फिर्यादी धायगुडे यांनी ठरल्याप्रमाणे खासगी सावकार बरकडे याला दरमहा २० हजार रुपये देत होते. परंतु काही दिवसानंतर धायगुडे यांनी घरगुती अडचणींमुळे व्याजाचे पैसे देणे जमले नाही. यानंतर खासगी सावकार सुरेश बरकडे बाळू बरकडे व सुरेश चा मुलगा शेखर बरकडे यांनी धायगुडे यांना पैशासाठी वेळोवेळी मारहाण व दमदाटी केली होती. तसेच डिसेंबर 2016 ते जून 2017 पर्यंत धायगुडे यांनी व्याजाची रक्कम खासगी सावकार बरकडे याला दिली होती. मुद्दल आणि व्याजाची रक्कम दिल्यानंतर धायगुडे यांनी बरकडेला त्यांची 32 गुंठे जमीन परत देण्याची विनंती केली. परंतु उलट तीस हजार रुपये येणे बाकी असल्याचे सांगत अजून 12 गुंठे जमीन सुरेश रामचंद्र बरकडे, बाळू रामचंद्र बरकडे व शेखर सुरेश बरकडे यांनी त्यांच्या नावावर करून घेतली. एवढे होऊन सुद्धा निर्ढावलेल्या खासगी सावकार बरकडे कुटुंबाने संपत धायगुडे यांच्याकडे पैशाचा तगादा लावला. तसेच वेळोवेळी मारहाणी केली शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून संपत धायगुडे यांनी आपली कैफियत सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे मांडली. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेऊन संदीप पाटील यांनी संबंधित खासगी सावकारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. यानंतर सुरेश रामचंद्र बरकडे बाळू रामचंद्र बरकडे व शेखर सुरेश बरकडे यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |