04:33am | Apr 30, 2019 |
खंडाळा : वडील हा घराचा भक्कम आधार असतो. माता-पित्यांची वृद्धपणी सेवा करणारी मुलेच ईश्वराची देण असतात. जे वृद्धपणी आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडतात त्यांना मुले म्हणवून घेण्याचा अजिबात हक्क नसतो. आजच्या पिढीतील मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांना स्वत:च्या श्वासाप्रमाणे सांभाळायला हवे, असे प्रतिपादन ह.भ.प. उमेश कीर्दत महाराज यांनी केले.
वाण्याचीवाडी, ता. खंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहात स्व. वसंतराव पाटणे यांच्या तृतीय पुण्यतिथी सोहळ्यात आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते.
ह.भ.प.कीर्दत महाराज म्हणाले, टी.व्ही. व चित्रपटातील हिरोंपेक्षा आपले आई-वडील हेच आपले हिरो असले पाहिजेत. मात्र, आज तशी परिस्थिती दिसत नाही. मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडतात. म्हातारपणी त्यांचा सांभाळ करत नाहीत, अशी मुले समाजात सुद्धा वावरायच्या योग्यतेची नाहीत. खंडाळा तालुक्यातल्या एका दुर्गम गावात वसंतराव पाटणे यांनी संस्काराच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाची उभारणी केली. आज 28 वर्षे एक छोटीशी वाडी हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहे. वसंतराव पाटणे यांच्या निधनानंतर त्यांची मुले वडिलांचा वसा सांभाळत आहेत. ज्या गावात रस्ते नव्हते, पाणी नव्हते, शाळा नव्हती, स्मशानभूमी नव्हती, सुव्यवस्थेचा अभाव होता. त्या गावात हरीष पाटणे यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने नंदनवन उभे केले आहे. छोटीशी वाडी शहराला लाजवेल असा विकासाचा बाज घेवून उभी रहात आहे. वडिलांचे संस्कार कसे असावे याचा आदर्श वाण्याचीवाडी येथे आल्यानंतर पहायला मिळाला. उच्चपदावर असूनही एवढी विनम्रता, गरीब माणसांमध्ये मिसळण्याची वृत्ती आणि वाडीसह पंचक्रोशीतील गरजवंतांना मदत करण्याची प्रामाणिक भावना त्यांच्या मुलांमध्ये दिसते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून हे गाव एकसंध आहे. छोटे छोटे सण, सार्वजनिक कार्यक्रम एकदिलाने करणारी ही वाडी त्यामुळेच तालुक्याचे उत्तम संस्कार पीठ झाली आहे, असेही कीर्दत महाराज म्हणाले.
ग्रामस्थांच्यावतीने बोलताना हरीष पाटणे म्हणाले, टीव्ही आणि चित्रपटातील नटांना अनेकजण आपले हिरो मानतात, पुस्तकांमधील नायकांना अनेकजण आदर्श समाजसुधारक मानतात. मी माझ्या आयुष्यात वडिलांशिवाय दुसरा हिरो पाहिला नाही. माझ्या घरातच जीताजागता समाजसुधारक होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या भागातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांचीच शिकवण हयातभर जपेन.
यावेळी वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडी, पारगाव, असवली, अजनुज, खंडाळा, बावडा परिसरातील ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |