चंदिगढ : हरियाणामध्ये बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या दोषीला थेट फाशीची शिक्षा होणार आहे. बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा सुनावणारं हरियाणा हे देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे.
12 वर्षाखालील बालिकेवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं, तर दोषीला सर्वोच्च शिक्षा सुनावली जाणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी व्यथित होऊन काही महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर हरियाणा विधानसभेने गुरुवारी या ऐतिहासिक कायद्याला एकमताने मंजुरी दिली.
भाजपसोबतच इंडियन नॅशनल लोकदल आणि काँग्रेस आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, बलात्कार पीडितेचं वय काहीही असो, दोषींना फाशीच हवी, अशी मागणीही काँग्रेस आमदार किरण चौधरींनी केली.
यापूर्वी, मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्याचं विधेयक मंजूर केलं होतं.
'कलम 376- अअ'नुसार 12 वर्षांखालील बालिकेवर बलात्कार झाल्यास मृत्यूदंड किंवा 14 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची तरतूद आहे. हा कारावास कैद्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत वाढवलाही जाऊ शकतो.
'कलम 376- डअ'नुसार 12 वर्षांखालील बालिकेवर एकापेक्षा जास्त व्यक्तींनी बलात्कार (सामूहिक बलात्कार) केला, तर दोषींना 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा सश्रम कारावास ठोठावला जाऊ शकतो.
बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या दोषीला फाशीची शिक्षा करणारा कायदा महाराष्ट्रात कधी होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |