02:37am | Jul 25, 2019 |
सातारा : सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा कोल्हापूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यासह सातारा पोलीस दलातील महिला हेड-कॉन्स्टेबल श्रीमती दया डोईफोडे यांना निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारा राज्यातील पहिला लोकशाही पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी दिनांक 27 रोजी देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा कोल्हापूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असताना निवडणुक मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडली होती. याची दखल घेवून राज्य निवडणूक आयोगाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्राच्या आतमध्ये गाडी आण्यावरून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व डोईफोडे यांच्यात वाद झाला होता. तेव्हा अनेक उपस्थितांनी चरेगावकर हे मंत्री दर्जाचे नेते असून त्यांची गाडी आत सोडा अशी डोईफोडे यांना विनंती करून देखील त्यांनी चरेगावकर यांना आत सोडले नव्हते. डोईफोडे यांनी दबावाला बळी न पडता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यानेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांचा सन्मान केला आहे.
ही घोषणा आज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज मुंबई येथे केली. हे पुरस्कार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. २७) वितरण करण्यात येणार आहेत. यावेळी सहारिया यांनी सांगितले की, मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन २०१६ आणि २०१७ या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या सहा गटात एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
गटनिहाय पुरस्कार विजेत्यांची नावे अशी
निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे:
१) माथेरान हॉटेल असोसिएशन
२) मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ
३) महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह
४)असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्
५)मुंबई विद्यापीठ मुंबई
६)रिसोर्स ॲण्ड सपोट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट
७) संदीप भास्कर जाधव, सोलापूर.
निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे:
१) डॉ.अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली,
२) दया अर्जुन डोईफोडे, पोलिस हेड कॉन्सटेबल, कराड
३) केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगरपरिषद
निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती:
१) गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे.
निवडणूक प्रक्रियेत संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
१) माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन.
निवडणुकांमध्ये मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढविणे:
१) बृहन्मुंबई महानगरपालिका
निवडणुका सुरळीत पार पाडणे, निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर करणे आणि मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ:
१) ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |