सातारा : कोरेगाव तालुक्यातील राजमा (घेवडा) पिकाला देशभरच्या बाजार पेठेत मोठी मागणी आहे. परंतु, अलीकडच्या पंधरा ते वीस वर्षांत राजमाचे उत्पन्न घटले होते. आता शेतकरी राजमा पिकवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजमा पिकांची वाढ झालेली आहे. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शाखा वाठार स्टेशन यांच्या प्रयत्नातून राजमा (घेवडा) लिलाव प्रक्रियेला सुरवात झाली असून १५० क्विंटल आवक व विक्री पहिल्यां दिवशी झाली .
नगदी पीक म्हणून बागायती,उसाच्या पिकाकडे पाहिले जात होते. पण, वेळेत दर मिळत नसल्याने कोरेगाव परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकरी अडचणीत आला होता. अशा वेळी पुन्हा राजमा पिकाची लागवड केल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाली होती. करंजखोप, वाठार, तडवळे, जळगाव, पिंपोडे, सोनके, नांदवळ, पळशी, देऊर, सातारा रोड, बनवडी, आसनगाव परिसरात राजमा पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दमदार सुरुवात केली आहे. त्यास ४४०० ते ४५७० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे.
कोरेगाव परिसरातील राजमाची गुणवत्ता चांगली असते.दिल्ली येथील बाजार पेठेत राजमा खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी मोठं मोठे व्यापारी कोरेगावत येतात. किमान सहा हजार रुपये पर्यंत राजमाला दर मिळण्याची शक्यता आहे .येथील राजमा चांगल्या प्रतीचा व 9 ते 13 आर्द्रता असलेला असतो.
कोरेगाव तालुक्यातील राजमा पीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळवण्यासाठी कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रतापराव कुमुकले व व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभाग होत आहेत.सध्या केंद्र व राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्यानंतर कोरेगावत राजमा पिकाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी कृषी अधिकारी व शेतकरी मेळाव्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही चांगली गोष्ट असून यामुळे मागासवर्गीय, दलित, कष्टकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकजण शेतात कष्ट करीत असल्याचे चित्र दिसत आहे अशी माहिती कोरेगावचे सुपुत्र व भाजप अनु, जाती-जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष रमेश उबाळे व शेतकऱ्यांनी दिली आहे. कोरेगाव तालुक्यातील राजमा (घेवडा) पिकाला देशभरच्या बाजार पेठेत मोठी मागणी आहे. परंतु, अलीकडच्या पंधरा ते वीस वर्षांत राजमाचे उत्पन्न घटले होते. आता शेतकरी राजमा पिकवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजमा पिकांची वाढ झालेली आहे. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शाखा वाठार स्टेशन यांच्या प्रयत्नातून राजमा( घेवडा) लिलाव प्रक्रियेला सुरवात झाली असून १५० क्विंटल आवक व विक्री पहिल्यां दिवशी झाली .
नगदी पीक म्हणून बागायती,उसाच्या पिकाकडे पाहिले जात होते. पण, वेळेत दर मिळत नसल्याने कोरेगाव परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकरी अडचणीत आला होता. अशा वेळी पुन्हा राजमा पिकाची लागवड केल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाली होती.करंजखोप,वाठार, तडवळे, जळगाव,पिंपोडे, सोनके, नांदवळ, पळशी, देऊर, सातारा रोड, बनवडी, आसनगाव परिसरात राजमा पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दमदार सुरुवात केली आहे.त्यास ४४०० ते ४५७० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे.
कोरेगाव परिसरातील राजमाची गुणवत्ता चांगली असते.दिल्ली येथील बाजार पेठेत राजमा खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी मोठं मोठे व्यापारी कोरेगावत येतात. किमान सहा हजार रुपये पर्यंत राजमाला दर मिळण्याची शक्यता आहे .येथील राजमा चांगल्या प्रतीचा व 9 ते 13 आर्द्रता असलेला असतो.
कोरेगाव तालुक्यातील राजमा पीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळवण्यासाठी कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रतापराव कुमुकले व व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभाग होत आहेत.सध्या केंद्र व राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्यानंतर कोरेगावत राजमा पिकाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी कृषी अधिकारी व शेतकरी मेळाव्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही चांगली गोष्ट असून यामुळे मागासवर्गीय, दलित, कष्टकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकजण शेतात कष्ट करीत असल्याचे चित्र दिसत आहे अशी माहिती कोरेगावचे सुपुत्र व भाजप अनु, जाती-जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष रमेश उबाळे व शेतकऱ्यांनी दिली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |