सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनवेळी बॉम्बे रेस्टारंट चौकातील परिसरात झालेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 63 आंदोलकांची जिल्हा व सत्र न्यायाधिश अमेटा यांनी जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान, याबाबत न्यायालयात दोन्ही पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर शुक्रवारी न्यायाधिशांनी जामीन मंजूर केला.
मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या आंदोलनाच्या दुसर्या सत्रात बुधवारी (दि. 25) सातार्यात आंदोलन पुकारण्यात आले. या वेळी शहरातून अभूतपूर्व ठोक मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी 9.30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही आंदोलक बॉम्बे रेस्टारंट चौकात गेले. अचानक याठिकाणी आंदोलक व महामार्ग अडवला व जाळपोळ करण्या सुरुवात झाली. पाहता पाहता आंदोलक आक्रमक बनले व ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिस शांततेचे आवाहन करत होते. यातच आंदोलन चिघळले व तुफान दगडफेकीला सुरुवात झाली.
आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू करत पोलिस व्हॅनचीही तोडफोड केली. यामध्ये तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह 34 पोलीस जखमी झाले होते. पोलिसांसह खासगी वाहने, दुकानांचीही आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली होती. पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन ते अडीच हजार आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला.
सुमारे तीन तास झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी 63 जणांची धरपकड करुन अटक केली. संशयित सर्वांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मराठा समाजाच्यावतीने सुमारे दीडशे वकीलांची फौज न्यायालयात उतरवण्यात आली होती. जामीन अर्जावर न्यायालयात यावर वेळोवेळी दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. जामीन अर्जावर शुक्रवारी तारीख देण्यात आली होती. सायंकाळी न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्वांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच आंदोलकांना दर सोमवारी व शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असणारे सर्व आंदोलक सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात आहेत. शनिवारी व त्यानंतर सोमवारपासून संबंधितांची मुक्तता होणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |