नागठाणे : कोपर्डे, ता. सातारा येथील लिंबाचीपट्टी नावच्या शिवारात तारळे प्रकल्पाअंतर्गत मे. प्रसाद ऍण्ड कंपनीमार्फत सुरू असणाऱ्या पाईपलाईन कामावर एका मजूर कामगार महिलेचा विहिरीत पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रंगाम्मा विरेश बोगम (वय 35, रा. धनवाडा ता. धनवाडा जि. महाबूबनगर राज्य तेलांगणा. सध्या रा.वेणेगाव ता.सातारा) असे मृत झालेल्या मजुर महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात महिन्यापासून मे.प्रसाद ऍण्ड कंपनी सासपडे येथे मजुरी करण्यासाठी हे कुटुंब आले होते. कोपर्डे हद्दीतील नागाईदेवी मंदिराजवळ लिंबाचीपट्टी नावच्या शिवारात तारळी प्रकल्पाअंतर्गत पाईपलाईनचे काम करण्यासाठी सोमवारी सकाळी रंगाम्मा व तिची आई व्यंकटमा आले असताना नेहमीप्रमाणे साईडवर जेवायला बसले होते. यावेळी रंगाम्मा ही कोपर्डे येथील काकासो सिताराम निकम यांच्या मालकीच्या विहिरीवर घागर घेऊन पाणी आणण्यासाठी गेली होती.
जेवण झाले तरी रंगाम्मा येत नसल्याचे पाहून आई व्यंकटमा हिने कामावर असणारे राजू काशीमाप्पा कावरी यांना विहिरीवर जाण्यासाठी सांगितले. मात्र कावरी हा विहिरीजवळ गेला असता फक्त घागर व चप्पल विहिरीत दिसत होत्या. रंगाम्मा नसल्याचे पाहून रंगाम्मा विहिरीत बुडल्याचे लक्षात येताच कावरीने आरडाओरडा केला. यावेळी रंगाम्माचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |