कराड : विद्यार्थी हा वर्षभर अभ्यासाच्या ताणतणावामध्ये असतो. त्यामधून मुक्त होण्यासाठी व त्याच्या कला गुणांना वाव मिळून योग्य दिशा मिळण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कराड तालुक्याचे तहसिलदार मा. श्री. राजेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
रंगराव माने चॅरीटेबल ट्रस्ट संचालित ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल वाघेरी (ता.कराड) यांचे स्नेहसंमेलन कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लागीर झालं जी फेम (नाना) देवेंन्द्र देव उपस्थित होते. तसेच हया कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जयवंत शेलार-शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा. विजय वाटेगावंकर-सभापती कराड नगरपालिका कराड, रामभाऊ रैनाक, वाघेरी गावचे सरपंच सर्फराज पटेल, मोहनराव माने अध्यक्ष, ऍड. संभाजीराव मोहिते, अप्पासाहेब गायकवाउ परिवर्तन प्रतिष्ठानचे संस्थापक उस्मान सय्यद, अशोक शिंदे, शंकरराव वीर, संजय माने हे मान्यवर होते.
स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी प्रथम सर्व पालकांचे स्वागत केले व म्हणाले की, विद्यार्थी जे कलागुण सादर करतात त्यावेळी त्यांना प्रोत्साहन देवून शाबासकीची थाप दिली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला गती मिळते.
स्कूलच्या डायरेक्टर वासंती माने यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे. असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ कायदेतज्ञ संभाजीराव मोहिते यांनी आपल्या भाषणात शाळेच्या घडामोडीचा आढावा घेऊन शाळेच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात देवेंन्द्र म्हणाले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकास शिक्षक व पालक करतात. मुलांना समजून संागणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाच्या घरी नाना असावेत असे प्रत्येकाला वाटते. प्रत्येकाच्या आईला आपल्या मुलाचे कलागुण माहित असतात.
विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचे प्रदर्शन करून समारंभाची शोभा वाढवावी. शाळेच्या प्रिन्सीपल सौ. सोनटके मॅडम यांनी शाळेचा वार्षिक अहवालाचे वाचन केले व कार्यक्रमाची सांगता जगताप सर यांनी आभार प्रकट करून केली.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |