सातारा : वडजल, ता. फलटणच्या हद्दीत गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.या निर्घृण हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला असून, दोघांना पुणे व अकलूज येथून ताब्यात घेतले आहे. रोशन अविनाश भोसले (वय 20) व सनी उर्फ भोलेशंकर चंद्रकांत भोसले (वय 18, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, अकलूज, सध्या रा. बडेखान, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत. जुने भांडण आणि नात्यातील मुलीला घेऊन गेल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी एकजण फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 28 नोव्हेंबर रोजी वडजल गावच्या हद्दीत निर्जनस्थळी एका अज्ञात व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेतेत मृतदेह आढळून आला होता. त्याबाबत पोलीस पाटील विजयकुमार ढेंबरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांना सुचना दिल्या. त्या अनुषंगाने कुंभार यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्यासह घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली व जर्हाड यांच्यासह पथक नेमण्यात आले.
दरम्यान, दि. 29 नोव्हेंबरला मृताची ओळख पटली व मृत व्यक्ती हा प्रकाश फोरमन पवार रा. शिंदेवाडी ता, फलटण असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी संशयीतांनी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान होते. पोलिस पथकाने सर्वप्रथम मृतांच्या नातेवाईकांचेकडून संपूर्ण माहिती घेतली व गोपनिय खबर्यांकडून संशयीतांबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.
बातमीदारामार्फत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कोण आहेत, याची गोपनिय माहिती मिळाली. संशयीत हे पुणे व सोलापूर जिल्ह्यामध्ये पळून गेले असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानंतर तपास पथकाने आरोपींना पुणे व अकलूज येथून ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयीतांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यातील संशयीतांनी सांगितले की, मृत प्रकाश पवार व त्याचे नातेवाईक यांच्याशी जुन्या भांडणाच्या व पैशांच्या देवाण घेवाणावरून वाद होता. मृताच्या नात्यातील मुलीस संशयीताच्या नात्यातील व्यक्तीने घेवून गेल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद होते. मृत प्रकाश पवार हा सशंयीतांना व त्यांच्या नातेवाईकांना फलटणला आल्यास गाडी अडवून मारहाण करत असे. त्यामुळे संशयीत त्यांच्यावर चिडून होते.
फलटणमध्ये श्रीराम रथ यात्रेकरीता दि. 27 नोव्हेंबर रोजी संशयीत आले होते. यात्रेतून परत जात असताना सायंकाळी 7.30 वाजता सुमारास प्रकाश फोरमन पवार हे जिंतीनाका परिसरामध्ये रस्त्यावरच दारू पिवून पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यास तिन्ही संशयीतांनी उठवून मोटार सायकलवर बसवून वडजल ते भिलकटी रोडवर निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. प्रकाश पवार यांस तु आम्हास का त्रास देतोस, असे विचारल्यावर त्यांनी तुम्ही फलटणमध्ये यायचे नाही, असे बोलले. त्यानंतर तीन संशयीतांनी प्रकाश पवार यांस कटरच्या सहाय्याने गळा कापून त्याचा खून केल्याचे सांगितले आहे. दोन आरोपींनी प्रकाश पवार यांचे हात-पाय पकडले व एका आरोपीने त्यांच्या गळ्यावर कटरने वार केले, अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाली आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, हवालदार उत्तम दबडे, पो. ना. योगेश पोळ, प्रवीण फडतरे, अजित कर्णे, प्रविण कडव, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, संजय जाधव यांनी नमुद कारवाईमध्ये सहभाग घेतला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.
निर्घृण हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला असून, दोघांना पुणे व अकलूज येथून ताब्यात घेतले आहे. रोशन अविनाश भोसले (वय 20) व सनी उर्फ भोलेशंकर चंद्रकांत भोसले (वय 18, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, अकलूज, सध्या रा. बडेखान, ता. फलटण) अशी