सातारा : बसाप्पा पेठ, करंजे येथील किड्स केअर स्कूलमध्ये एकाने धुडगूस घालत शिक्षकांना कोंडून शाळेच्या आवारातील कुंड्याची तोेडफोड केली. दोन टप्प्यात ही घटना घडली असून या घटनेने शाळेतील मुलांसह शिक्षक भेदरले आहेत. याप्रकरणी शिक्षकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्रवीण चंद्रकांत जाधव (रा.करंजे पेठ, सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी निलोफर मुसरत खान (वय 30, रा.मोळाचा ओढा) या शिक्षकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 2 रोजी दुपारी अडीच वाजता व दि. 10 रोजी सकाळी आठ वाजता ही घटना घडली आहे. संशयिताने शाळेच्या आवारात प्रवेश करुन आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे शाळेतील मुले घाबरुन गेली. याच दरम्यान, संशयिताने शिक्षकांना कोंडले व पुन्हा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. शिक्षकांना कोंडल्यानंतर संशयित प्रवीण जाधव याने शाळेच्या आवारातील कुंड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. सुमारे 14 कुंड्यांची तोडफोड केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरु होता. गोंधळ घालत तोडफोड केल्यानंतर संशयिताने स्वत: च्या जिवीताचे बरे वाईट करण्याची धमकी देवून शिवीगाळ केली. यानंतर तो तेथून पसार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित प्रवीण जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. घटनेचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिस तपास करत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |